Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पुरुषांनो दुर्लक्ष नको! तुम्हालाही होऊ शकतो ब्रेस्ट कॅन्सर! लक्षणे, कारणे अन् पूर्ण उपचार जाणून घ्या

Male breast cancer symptoms causes treatment : स्तन कर्करोग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त महिला येतात. मात्र, ही धारणा बदलण्याची वेळ आली आहे! हा आजार पुरुषांनाही होऊ शकतो, आणि महत्त्वाचे म्हणजे, जागरूकता नसल्यामुळे पुरुषांमध्ये याचं निदान उशिरा होते. जागतिक स्तरावर एकूण स्तन कर्करोगाच्या प्रकरणांपैकी सुमारे १ टक्के प्रकरणे पुरुषांमध्ये आढळतात. त्यामुळे, ही केवळ महिलांची समस्या नसून, प्रत्येक पुरुषाने याबद्दल जागरूक असणे आवश्यक आहे.

'बोल्ड स्काय'च्या वृत्तानुसार, स्तन कर्करोग जागरूकता महिन्याच्या निमित्ताने, नारायणा हॉस्पिटल, जयपूर येथील रेडिएशन ऑन्कोलॉजीच्या संचालिका डॉ. निधी पाटनी यांच्याकडून पुरुषांमधील स्तन कर्करोगाची लक्षणे, कारणे आणि उपचारांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. वेळेवर निदान झाल्यास, पुरुषांमध्येही यावर मात करण्याची शक्यता खूप वाढते.

Male breast cancer symptoms causes treatment

पुरुषांमध्ये स्तन कर्करोग: कारणे, लक्षणे आणि उपचार

१. पुरुषांमध्ये स्तन कर्करोगाची कारणे (Causes Of Breast Cancer In Men)

पुरुषांमध्ये स्तन कर्करोगाचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील हार्मोनल असंतुलन, विशेषतः इस्ट्रोजेन (स्त्री हार्मोन) ची पातळी वाढणे. हे असंतुलन खालील कारणांमुळे होऊ शकते.

लठ्ठपणा : वाढत्या वजनामुळे हार्मोनल बदल होतात.

यकृताचे आजार : यकृताच्या समस्यांमुळे इस्ट्रोजेनचे प्रमाण वाढू शकते.

दीर्घकालीन औषधोपचार : काही औषधांच्या दीर्घकाळ सेवनामुळे.

अनुवांशिक कारणे : कुटुंबात BRCA1 किंवा BRCA2 जीनमध्ये दोष असल्यास धोका वाढतो.

इतर धोक्याचे घटक: अल्कोहोलचे (दारू) अतिसेवन, विकिरण संपर्क आणि वाढते वय यांचाही धोका असतो.

२. पुरुषांमध्ये स्तन कर्करोगाची लक्षणे (Symptoms Of Breast Cancer In Men)

पुरुषांमध्ये सुरुवातीची लक्षणे सौम्य असल्याने अनेकदा ती दुर्लक्षित राहतात. मात्र, खालील पाच लक्षणांवर लक्ष देणे आवश्यक आहे:

स्तनामध्ये वेदना नसणारी गाठ : स्तन क्षेत्रात कोणतीही वेदना नसणारी गाठ हे सर्वात सामान्य लक्षण आहे.

निप्पलची समस्या : निप्पल (स्तनाग्र) मधून द्रव किंवा रक्तस्त्राव होणे.

निप्पल आत ओढले जाणे : निप्पलचा भाग आतल्या बाजूला वळणे.

त्वचेतील बदल : स्तनावर लालसरपणा, सूज किंवा त्वचा जाड व खरखरीत होणे.

काखेतील सूज : कधीकधी काखेजवळच्या लिम्फ नोड्समध्ये सूज देखील दिसून येते.

३. पुरुषांमध्ये स्तन कर्करोगाचा उपचार (Breast Cancer Treatment In Men)

शस्त्रक्रिया : प्राथमिक अवस्थेत ट्यूमर शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकला जातो.

रेडिएशन/केमोथेरपी : शस्त्रक्रियेनंतर कर्करोग पुन्हा होण्याची शक्यता कमी करण्यासाठी रेडिएशन थेरपी किंवा केमोथेरपी दिली जाते.

हार्मोन थेरपी : जर कर्करोग हार्मोनवर अवलंबून असेल, तर इस्ट्रोजेनची क्रिया थांबवण्यासाठी हार्मोन थेरपीचा उपयोग केला जातो.

प्रगत उपचार : प्रगत अवस्थेमध्ये टार्गेटेड थेरपी (Targeted Therapy) आणि इम्युनोथेरपी (Immunotherapy) सारख्या आधुनिक पद्धतींचा वापर केला जातो.

४. पुरुषांमध्ये स्तन कर्करोगाची प्रतिबंधात्मक उपाययोजना (Prevention Of Breast Cancer In Men)

  • प्रत्येक प्रकरणात कर्करोग थांबवता येत नसला तरी, खालील उपायांनी धोका कमी करता येतो:
  • संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि निरोगी वजन राखल्यास हार्मोनची पातळी नियंत्रणात राहते.
  • दारूचे सेवन मर्यादित करा आणि धूम्रपान टाळा.
  • कुटुंबात कर्करोगाचा इतिहास असलेल्या पुरुषांनी नियमितपणे तपासणी करावी आणि आवश्यक असल्यास अनुवांशिक चाचणी करावी.
  • डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळोवेळी स्वत: तपासणी करावी.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+