Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Ketchup Side Effects : तुमच्या लाडक्या मुलांसाठी 'टाॅमेटो सॉस' खाणे धोकादायक! हे 5 मोठे दुष्परिणाम

Ketchup Side Effects : केचअप म्हणजेच साॅस होय.. टाॅमेटो साॅस कुणालाही ते खायला आवडते. समोसा असो की वडापाव अथवा फ्रेंच फ्राईज, सँडविच असो वा पास्ता... प्रत्येक पदार्थासोबत मुलांना आवडणारा 'लाल सॉस' हा खायला छान वाटतो, पण हा छान वाटणारा साॅस जर धोकादायक असेल तर..होय ना.. विश्वास बसत नसेल पण तुमच्या लाडक्या मुलांसाठी केचअप खाणे धोक्यापेक्षा कमी नाही.

ketchup side effects

सॉस तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी एक 'लिटल किलर' ठरू शकतो? त्याचे मोठे कारण तज्ज्ञ सांगतात. तज्ज्ञांच्या मते, केचपमध्ये असलेल्या अतिरिक्त साखर, मीठ आणि केमिकल्समुळे लहान मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, मग तज्ज्ञ सांगत असतील तर आपण केचअप खायचा की नाही हे आता ठरवण्याची वेळ आली आहे.

बोल्ड स्कायने वृत्त दिले आहे, त्यानुसार, न्यूट्रिशनिस्ट निकिता गुप्ता यांनी सांगितल्यानुसार, रोजच्या आहारात केचपचा समावेश करणे म्हणजे आरोग्याला धोक्यात घालण्यासारखे आहे. केचअप कधी तरी खाल्ले तर ठीक पण रोजच ते आपण खात असू अथवा मुलांना देत असू तर ..आहारतज्ज्ञ काय म्हणतात हे जाणून घेऊया.

केचअप कसा तयार केला जातो?

आहारतज्ज्ञ निकिता गुप्ता यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे, बाजारात मिळणाऱ्या केचपमध्ये E415 (जैंथन गम) नावाचा एक विरघळणारा फायबर असतो, जो इसबगोलसारखाच असतो. पण, यात साखर आणि मीठ मोठ्या प्रमाणात असते. कधीतरी खाल्ल्यास त्याने नुकसान होत नाही, पण रोज खाणे धोकादायक आहे.

केचअपचे पाच मोठे दुष्परिणाम

१. लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोका : केचपमध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोका वाढू शकतो.

२. अ‍ॅलर्जी आणि पोटाचे विकार : यात असलेले संरक्षक आणि कृत्रिम रंग (प्रेझर्व्हेटिव्ह्ज) अ‍ॅलर्जी, पोटदुखी आणि पचनसंस्थेच्या समस्या निर्माण करू शकतात.

३. दात खराब होणे : उच्च साखर आणि अ‍ॅसिडिक घटक दातांवर परिणाम करतात, ज्यामुळे लवकर कॅव्हिटी (Cavity) आणि दात किडण्याची शक्यता वाढते.

४. अयोग्य खाण्याच्या सवयी : केचपच्या चवीची सवय लागल्याने मुले सामान्य आणि पौष्टिक पदार्थ खाणे टाळतात.

५. हृदय आणि यकृतावर परिणाम : दीर्घकाळ केचपचे सेवन केल्यास मुलांच्या हृदय आणि यकृतावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यामुळे, आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी हा 'लाल सॉस' देण्यापूर्वी एकदा विचार करा.

हेही वाचा : Heart Disease : हृदयरोगाची संबंधित या' 3 लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, ही आहेत कमकुवत हृदयाची लक्षणे!

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+