Heart Disease : हृदयरोगाची संबंधित या' 3 लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, ही आहेत कमकुवत हृदयाची लक्षणे!
Heart Disease : तुमच्या हृदयाची धडकन म्हणून ज्याला म्हटलं जातं ते तुम्हीच आहात. कारण तुमचे हृदय जर चांगले निरोगी असेल तर तुमच्या हृदयाची धडकन अर्थात ठोके व्यवस्थित चालतात. यात बिघाड झाला की ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.पण हे समजण्यासाठी हृदयरोगाची लक्षणे जाणून घेणे आवश्यक आहे.
हृदयरोगाची सामान्य लक्षणे म्हणजे छातीत घट्टपणा, वेदना आणि छातीत दाब जाणवणे याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. पण हृदयविकार आहे हे समजण्यासाठी ही लक्षणे पुरेशी नाहीत, या लक्षणांव्यतिरिक्त, अशी अनेक लक्षणे आहेत जी सांगतात की, तुम्हाला हृदयाचा आजार आहे. आपण याच लक्षणांवर जाणून घेणार आहोत.

अमेरिकन हृदय शल्यचिकित्सक डॉ. जेरेमी लंडन यांच्या मते, हृदयविकाराशी संबंधित काही चिन्हे आहेत जी लोक ओळखू शकत नाहीत आणि नंतर ते गंभीर समस्येत बदलतात. ही समस्या वेळीच टाळण्यासाठी हृदयरोग तज्ज्ञांनी अशी 3 चिन्हे दिली आहेत, जी अगदी सामान्य आहेत पण हृदयविकारांशी संबंधित आहेत, त्यांना ओळखून तुम्ही एक मोठी समस्या टाळू शकता
1. श्वास लागणे
हे हृदयाच्या आजाराशी निगडीत मुख्य आणि सामान्य लक्षण आहे आणि ते शरीरात ऑक्सिजनची कमतरता किंवा हृदयाची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे असू शकते. डॉक्टर जेरेमी लंडन यांच्या मते, ही स्थिती सुरुवातीला शारीरिक हालचालींदरम्यान उद्भवते, परंतु जसजशी समस्या वाढत जाते तसतसे हे लक्षण सामान्य होते. तुम्ही हे सहज लक्षात घेऊ शकता की विश्रांती घेत असतानाही तुम्हाला श्वासोच्छवासाची कमतरता जाणवू लागते, हे लक्षण आहे की तुमच्या हृदयात नक्कीच काहीतरी गडबड आहे. लक्षात ठेवा की हे लक्षण हृदय आणि फुफ्फुसाच्या दोन्ही आजारांशी संबंधित असू शकते आणि त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.
2. पाय आणि घोट्याला सूज येणे
पाय आणि घोट्याला सूज येणे हे हृदयाच्या रोगाते लक्षण आहे, कारण हृदय योग्यरित्या रक्त पंप करू शकत नाही आणि शरीरात द्रव जमा होऊ लागतो. परिणामी, ऊतकांमध्ये द्रव साचू लागतो, ज्यामुळे पाय आणि कधीकधी पोटात सूज येते. तज्ज्ञांच्या मते, जर तुमचे पाय कोणत्याही कारणाशिवाय अचानक सुजले. तसेच, छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, बेशुद्ध होणे, चक्कर येणे किंवा खोकल्यापासून रक्त येणे यासारखी लक्षणे दिसली तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
3. खोकला
डॉ. जेरेमी लंडन यांच्या मते, खोकला देखील हृदयाच्या विफलतेशी संबंधित एक लक्षण आहे. ज्याला ह्रदयाचा खोकला देखील म्हणतात. हा खोकला तेव्हा होतो जेव्हा फुफ्फुसात द्रव जमा होऊ लागतो आणि हृदयाची स्थिती बिघडू लागते.
जेव्हा तुम्ही खोकता तेव्हा तुमच्या लक्षात येते की खोकला ओला आहे, ज्यामध्ये श्लेष्मा येतो. खोकला रक्ताच्या डागांसह असू शकतो, जे फुफ्फुसांमध्ये द्रव जमा होण्याचे लक्षण असू शकते. याशिवाय तुम्हाला रात्री जास्त खोकला येत असेल किंवा झोपल्यानंतर हा खोकला वाढत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.












Click it and Unblock the Notifications