Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Watermelon : न कापता टरबूज लाल आणि गोड आहे हे कसे समजायचे! 'या' 5 गोष्टी तपासून तुम्ही ओळखू शकता

How to Identify if a Watermelon is Red and Sweet : टरबूज हे फळ थंडावा देणारे, उन्हाळा आला की, टरबूज फळाची आठवण होणार नाही असे कधीच होत नाही. टरबूजमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म तर असतोच पण हे फारच रसाळ फळ आहे जवळपास टरबूजमध्ये 90 टक्के पाणी असते. अशा स्थितीत आपण जेव्हा टरबूज खरेदी करतो तेव्हा ते कसे निघेल याची आपल्याला चिंता असते.

बहुदा काही जण जेव्हा टरबूज खरेदी करतात , तेव्हा ते पांढरे निघते किंवा त्याची लाली कमी असते. काहीवेळा तर टरबूज खूपच लाल असते अनपेक्षितपणे आपल्याला आनंद वाटतो पण न कापता लाल आणि चवीला गोट टरबूज कसे ओळखावे हे कदाचित माहीत नसेल.. आम्ही आपल्याला याच विषयावर आज माहिती देत आहोत. चला तर न कापता लाल आणि गोड टरबूज कसे ओळखायचे हे जाणून घेऊया.

How to Identify if a Watermelon is Red and Sweet

टरबूज निवडताना होते चलबिचल

ज्यावेळी तुम्ही टरबूज खरेदी करायला जाता तेव्हा हे घेऊ की, ते..अशी आपली स्थिती होते आणि अनेकदा लोक योग्य टरबूज निवडण्यात गोंधळतात. सर्व टरबूज बाहेरून सारखे दिसतात, पण आतून काही फिकट, काही कच्चे आणि काही चवीला पाणीदार असतात. रसायनांचा वापर करून पिकवलेले टरबूजही बाजारात विकले जात आहेत; ते लाल रंगाचे आहेत पण चवीला चविष्ट आहेत. मास्टर शेफच्या मते, काही सोप्या पद्धती वापरून, तुम्ही कोणते टरबूज कापल्याशिवायही लाल आणि गोड होईल हे ओळखू शकता.

हेही वाचा : टरबूजावरही इंजेक्शनद्वारे केमिकलचा मारा! कृत्रिम अन् नैसर्गिक पिकलेले टरबूज कसे ओळखायचे जाणून घ्या

गोड आणि नैसर्गिक टरबूज कसा निवडायचा

1.कलिंगडाच्या खालच्या बाजूला असलेला पिवळा ठिपका

कलिंगडाच्या खालच्या बाजूला असलेला पिवळा ठिपका तो त्याच्या गोडपणाचे पहिले लक्षण आहे. जर हा डाग गडद पिवळा किंवा मलाईदार पिवळा असेल तर समजून घ्या की टरबूज पिकलेला आणि गोड आहे. पांढरे किंवा हलके पिवळे डाग हे दर्शवितात की फळ कमी पिकलेले असू शकते.

2. वजनाकडे लक्ष द्या

एकाच आकाराच्या दोन टरबूजांपैकी, जड टरबूज जास्त रसाळ आणि गोड असेल. याचा अर्थ त्यात पाण्याचे प्रमाण जास्त आहे, जे गोडपणाचे लक्षण आहे.

3. बोटाने टरबूज वाजवून पाहा

कलिंगड, अथवा टरबूजावर हलकेच टॅप करून पाहा. जर त्याची गुंजन ऐकू आली तर ते टरबूज पूर्णपणे पिकलेले आहे आणि आतून लाल आहे. जर आवाज मंद येत असेल अथवा येत नसेल तर तो कच्चा किंवा कमी पिकलेला असू शकतो, हे समजावे.

4. टरबूजाची जाळी शोधा

अनेक टरबूजांच्या पृष्ठभागावर सोनेरी रेषा किंवा जाळीसारखे नमुने असतात. हे मधमाश्यांद्वारे परागणाचे लक्षण आहे आणि असे टरबूज अधिक गोड असतात.

5. टरबूजाचा आकार आणि त्वचा

बहुतेक गोड टरबूज गोल असतात तर आयताकृती किंवा अंडाकृती टरबूजांना सौम्य चव असू शकते. तसेच, जर कलिंगडाची साल निस्तेज (चमक नसलेली) आणि कडक असेल, तर ते फळ चांगले पिकले आहे याचे लक्षण आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+