Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी! HMPV व्हायरस मुंबईत पोहचला! 6 महिन्याच्या मुलीला संसर्ग

HMPV virus reaches Mumbai 6 month old girl infected : चीनमध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग झालेला एचएमपीव्ही विषाणू भारतात हळूहळू आपले पाय रोवत आहे. कर्नाटकातील बंगळुरूत आढळलेला व्हायरस गुजरात, नागपूरनंतर आता मुंबईतही आढळला आहे. या व्हायरसचा मुंबईत संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

सहा महिन्याच्या मुलीला एचएमपीव्हीची लागण

मुंबईतील एका सहा महिन्याच्या मुलीला एचएमपीव्हीची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मागील आठवड्यात तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिच्यावर आयसीयुत उपचार सुरु आहेत. संबंधित हाॅस्पिटलच्या डाॅक्टरांनी स्थानिक प्रशासनाला रुग्णासंदर्भात माहिती दिली आहे.

HMPV virus reaches Mumbai

(फोटो - AI)

तर दुसरीकडे अद्याप स्थानिक प्रशासनाकडून यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. देशभरात दहापेक्षा जास्त रुग्ण गेल्या काही दिवसांत आढळले आहेत. यातील काही रुग्ण बरे झाले असून काही बरे होत आहेत.मोठी बातमी!

हेही वाचा नागपूरमध्ये 2 बालकांमध्ये HMPV ची लक्षणे! सॅम्पल तपासणीसाठी प्रयोगशाळेत, अहवालानंतरच तथ्य समजणार

सर्वात पहिली केस बंगळुरुत आढळली त्यानंतर गुजरात, नागपूर आणि इतर राज्यात प्रकरणे आढळत गेली असून मुंबईतही एक रुग्ण सापडला आहे. दरम्यान संसर्गाच्या पार्श्वभुमीवर वैद्यकीय आरोग्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी कालच राज्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुट्ट्या रद्द करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

एसएमपीव्हीबद्दल माहिती...

HMPV चा प्रादुर्भाव कोणत्या देशातून सुरू झाला?

ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (HMPV) पहिल्यांदा 2001 मध्ये सापडला होता. तथापि, नवीन स्ट्रेनमुळे चीनमध्ये वाढ झाली आहे.

मानवी मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) म्हणजे काय?

ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (HMPV) हा एक विषाणू आहे जो सामान्यतः सामान्य सर्दी सारखीच लक्षणे कारणीभूत ठरतो आणि त्यामुळे वरच्या आणि खालच्या श्वसनमार्गाचे संक्रमण होऊ शकते.

हेही वाचा HMPV व्हायरसमुळे लॉकडाऊन पुन्हा लागू होणार का? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण

HMPV ची सामान्य लक्षणे कोणती आहेत?

खोकला, सर्दी, ताप, चोंदलेले नाक, घसा खवखवणे, घरघर, धाप लागणे (श्वास लागणे), पुरळ उठणे ही HMPV ची सामान्य लक्षणे अधोरेखित आहेत.

मानवी मेटापन्यूमोव्हायरस म्हणजे फक्त सर्दी आहे का?

HMPV मुळे बहुतेकदा सर्दीसारखी लक्षणे उद्भवतात. काही व्यक्ती विशेषत: त्यांच्या पहिल्या संसर्गाच्या वेळी. खूप आजारी होऊ शकतात.

मानवी मेटापन्यूमोव्हायरस किती सामान्य आहे?

संशोधकांचा असा अंदाज आहे की मुलांमधील श्वसनाचे आजारांपैकी 10 टक्के ते 12 टक्के HMPV मुळे होतात. बहुतेक प्रकरणे सौम्य असतात.

मानवी मेटापन्यूमोव्हायरस संसर्ग कशामुळे होतो?

एक विषाणू जो तुमच्या पेशींचा वापर स्वतःच्या अधिक विषाणूची संख्या वाढवण्यासाठी करतो, त्यामुळे HMPV होतो. RSV, गोवर आणि गालगुंड कारणीभूत असलेल्या विषाणूंच्या समान गटाचा हा भाग आहे.

हेही वाचा Hmpv prevention tips : जर तुमच्या घरात कोणाला HMPV व्हायरसचा संसर्ग झाला, तर काय करायचे? समजून घ्या

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+