Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

HMPV व्हायरसमुळे लॉकडाऊन पुन्हा लागू होणार का? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण

Lockdown in India: भारतात ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) चे चार रुग्ण समोर आल्यानंतर संभाव्य साथीच्या आजाराबाबत लोकांमध्ये चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी एका व्हिडिओ संदेशात स्पष्ट केले की हा विषाणू नवीन नाही. याला घाबरण्याची गरज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

जेपी नड्डा म्हणाले की, "एचएमपीव्ही हा नवीन विषाणू नाही. तो 2001 मध्ये पहिल्यांदा ओळखला गेला आहे. हा विषाणू अनेक वर्षांपासून जगभरात पसरत आहे. हा विषाणू श्वास घेताना हवेतून पसरतो आणि सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करतो. हा विषाणू हिवाळ्यात अधिक सक्रिय होऊ शकतो.

HMPV Virus

भारतातील सद्यस्थितीला सरकारची प्रतिक्रिया:

- आरोग्य मंत्रालय ICMR आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC) परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

- चीन आणि आसपासच्या देशांमध्ये एचएमपीव्हीची रुग्ण लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) परिस्थितीचा अभ्यास सुरू केला आहे आणि लवकरच त्याचा अहवाल शेअर करेल.

- ICMR आणि एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रमानुसार भारतात कोणत्याही सामान्य श्वसन विषाणूमध्ये अनपेक्षित वाढ झालेली नाही.

4 जानेवारी रोजी आरोग्य सेवा महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त देखरेख गटाची बैठक झाली. यामध्ये देशाच्या आरोग्य यंत्रणा आणि निगराणी नेटवर्कला सतर्क राहण्याच्या आणि आरोग्याच्या कोणत्याही नव्या आव्हानाचा सामना करण्यासाठी तत्काळ तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

एचएमपीव्ही विषाणू:

- सोमवारी भारतात एचएमपीव्हीची चार रुग्ण आढळून आली आहेत. दोन कर्नाटकात, एक गुजरातमध्ये आणि एक कोलकात्यात. ही सर्व रुग्ण 8 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये आढळून आली.

- आयसीएमआरच्या नियमित श्वसन विषाणूच्या निरीक्षणादरम्यान कर्नाटकात दोन रुग्ण आढळून आली.

- HMPV हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे. ज्यामुळे सामान्य सर्दी सारखीच सौम्य लक्षणे दिसून येतात.

- अभ्यासानुसार हा विषाणू 1970 पासून मानवी लोकसंख्येमध्ये पसरत आहे. 2001 मध्ये शास्त्रज्ञांनी या विषाणूची ओळख पटवली. हा विषाणू जगभरातील 4-16% तीव्र श्वसन संक्रमणास जबाबदार आहे.

#लॉकडाऊन ट्रेंड आणि सरकारचे आवाहन

भारतात HMPV चे चार रुग्ण समोर आल्यानंतर #lockdown सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला आहे. लोक याचा संबंध कोविड सारखी परिस्थिती पुन्हा येण्याच्या भीतीशी जोडू लागले आहेत. परंतु सरकार आणि आरोग्य तज्ञांनी स्पष्ट केले आहे की, एचएमपीव्ही नवीन नाही आणि तो सामान्य फ्लूसारखाच आहे.

घाबरण्याची गरज नाही. भारताची आरोग्य यंत्रणा आणि निगराणी नेटवर्क सतर्क आहेत. जनतेला अफवांवर लक्ष देऊ नये आणि घाबरून न जाण्याचे आवाहन सरकारच्यावतीने करण्यात आले आहे आहे. तज्ज्ञांच्या मते हा विषाणू महामारीचे स्वरूप धारण करण्याची शक्यता नाही. सध्याची आरोग्य यंत्रणा त्याला हाताळण्यासाठी पुरेशी आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+