नागपूरमध्ये 2 बालकांमध्ये HMPV ची लक्षणे! सॅम्पल तपासणीसाठी प्रयोगशाळेत, अहवालानंतरच तथ्य समजणार
HMPV symptoms found in 7-year-old boy from Nagpur : चीनमध्ये सुरु असलेल्या HMPV व्हायरस भारतात पोहचला असून बंगळुरू, गुजरातेत रुग्णाला लक्षणे आढळलेल्यानंतर नागपूरच्या 7 वर्षीय आणि 13 वर्षीय बालकामध्ये HMPV लक्षणे आढळली आहेत. त्याचा नमुना तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था -एनआयव्हीकडे पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, नागपूर मेडिकलचे अधीक्षक आणि बालरोग तज्ज्ञांनी हा आजार श्वसनावाटे पसरतो असे सांगून लहान मुलं आणि वृद्ध यांनी काळजी घ्यावी असे त्यांनी सांगितले. संशयित मुलं आता बरी झाली असून त्यांना रुग्णालायत दखल करून घ्यायची गरज भासली नाही, मात्र अधिक खोलवर तपास करण्यासाठी नमुने एनआयव्हीकडे पाठवण्यात आले आहे, असे ते एक खाजगी वृत्त वाहिनीला माहिती देताना म्हणाले.

दोन प्रकरणे, काय म्हणाले आरोग्य उपसंचालक?
नागपुरात एचएमपीव्हीचे दोन संशयित रुग्ण आढळून आले आहेत. हे रुग्ण अनुक्रमे 13 आणि 7 वर्षांचे आहेत. या दोन्ही संशयित रुग्णांच्या नोंदी एम्स नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात येत असल्याचे आरोग्य उपसंचालक शशिकांत शंभरकर यांनी सांगितले.
हेही वाचा : HMPV Virus : भारतात आढळला ह्युमन मोटान्यूनोचा पहिला रुग्ण, चिमुकल्या बाळाला संसर्ग, चीनमध्ये कहर
शंभरकर पुढे म्हणाले, "या दोन्ही रूग्णांचे अहवाल एका खाजगी रूग्णालयात पॉझिटिव्ह आले आहेत. या दोन्ही रूग्णांवर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या दोन्ही संशयित रूग्णांचे अहवाल एम्स नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत."
नागपुरात प्रकरणे नाही- ते रुग्ण फक्त संशयीत - जिल्हाधिकाऱ्यांची महत्वाची माहिती
नागपूर मध्ये एचएमपीव्ही विषाणूचा संसर्ग झालेल्याचा फक्त संशय आहे .सध्या माध्यमात आलेल्या बातम्यानुसार अशी कुठलीही केस सध्या नागपुरात अस्तित्वात नाही, असे स्पष्टीकरण नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना दिले. ज्या संशयीतांचे नमुने आयसीएमआर एनआयव्हीला पाठवले आहे त्याचा रिपोर्ट आल्यानंतरच याबाबत काहीतरी ठोस कारवाई करता येईल असे त्यांनी सांगितले. दरम्यान राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने एचएमपीव्ही विषाणूच्या बाबतीत जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा सगळ्यांनी अवलंब करावा असे आवाहन त्यांनी केले .
हेही वाचा : Hmpv prevention tips : जर तुमच्या घरात कोणाला HMPV व्हायरसचा संसर्ग झाला, तर काय करायचे? समजून घ्या
भारतात आतापर्यंत 5 नवे प्रकरणे
भारतात आधीच HMPV चे आतापर्यंत पाच प्रकरणे आढळून आली आहेत. यामध्ये कर्नाटकातील बंगळुरू येथे दोन प्रकरणांत निदान झाले असून गुजरातमधील अहमदाबादमध्ये आणखी एक प्रकरण नोंदवले गेले आणि महाराष्ट्रात एकूण 2 अशी पाच प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
हेही वाचा : सावधान! कोरोनानंतर आणखी एक महामारी येतेय? चीनमध्ये HMPV चा उद्रेक, भारताला दक्ष राहावे लागणार का?
हेही वाचा : चीनमध्ये कहर माजवणारा HMPV व्हायरस कसा पसरतो? किती आहे धोकादायक अन् प्रतिबंधात्मक उपाय जाणून घ्या












Click it and Unblock the Notifications