HMPV Virus : भारतात आढळला ह्युमन मोटान्यूनोचा पहिला रुग्ण, चिमुकल्या बाळाला संसर्ग, चीनमध्ये कहर
HMPV Virus : चीनमध्ये कोरोनासारख्याच असलेल्या ह्युमन मेटान्यूमोचा प्रादुर्भाव वाढत असतानाच आता भारतामध्येही याच विषाणूचा एक रुग्ण आढळला आहे. बंगळुरूतील एका आठ महिन्याच्या बाळाला HMPV विषाणूचा संसर्ग झाल्याचे निदान समोर आले आहे.
वन इंडिया हिंदीनुसार, आरोग्य विभागाने सांगितले की, एका खासगी रुग्णालयात आठ महिन्याच्या मुलीची चाचणी केली तेव्हा तिला HMPV चा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात शासकीय स्तरावर मुलीची कोणतीही चाचणी आज 6 जानेवारीला सकाळपर्यंत झाली नाही. आता खासगी रुग्णालयाच्या अहवालानंतर शासकीय रुग्णालय आणि प्रयोगशाळेत तपासणी झाल्यानंतर यासंदर्भात अधिक स्पष्टता होईल.

आरोग्य विभागातील एका सूत्राने सांगितले की, "खासगी हॉस्पिटलमधून हा अहवाल आला असून आम्हाला खासगी हॉस्पिटलच्या चाचण्यांबाबत शंका घेण्याचे कारण नाही." सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, HMPV म्हणजेच ह्युमन मेटा न्यूमोव्हायरस साधारणपणे 11 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये आढळतो आणि फ्लूच्या सर्व नमुन्यांपैकी 0.7 टक्के HMPV असतात, पण अद्याप हे माहित नाही की हा कोणत्या प्रकारचा व्हायरस आहे, कारण चीनमध्ये सापडलेल्या व्हायरसच्या प्रकाराविषयी डेटा नाही. भारत सरकारच्या म्हणण्यानुसार, भारतात HMPV ची प्रकरणे आधीच नोंदवली गेली आहेत.
श्वसन सर्दी आणि फ्ल्युची समस्या
आरोग्य मंत्रालयाच्या मते, हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे, यामुळे विशेषत: सर्दी आणि फ्लू सारख्या समस्या उद्भवतात. राष्ट्रीय आजार नियंत्रण संस्थेच्या (NCDC) माहितीनुसार, 2023 मध्ये चीनमध्येही या विषाणूची प्रकरणे नोंदवली गेली होती आणि इतर देशांमध्येही आढळून आली आहे.
हेही वाचा : चीनमध्ये कहर माजवणारा HMPV व्हायरस कसा पसरतो? किती आहे धोकादायक अन् प्रतिबंधात्मक उपाय जाणून घ्या
काय म्हणाले होते आरोग्य सेवा महासंचालक?
आरोग्य सेवा महासंचालक डॉ. अतुल गोयल म्हणाले की, भारतात या विषाणूमुळे कोणतीही गंभीर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाही. या हिवाळ्याच्या हंगामात भारतात सामान्य श्वसन संक्रमणांची संख्या वाढत आहे, परंतु ही असामान्य किंवा गंभीर परिस्थिती नाही. त्यांनी असेही सांगितले की रुग्णालयांमध्ये खाटा आणि ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा आहे आणि रूग्णांवर उपचार करण्यासाठी विशेष अँटीव्हायरल औषधांची आवश्यकता नाही.
ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) म्हणजे काय?
ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (HMPV) काय आहे HMPV हा श्वसनासंबंधीचा विषाणू आहे, ज्यामुळे सामान्य सर्दीसारखी लक्षणे दिसून येतात. हे विशेषतः मुले, वृद्ध आणि कमकुवत रोगप्रतिकारक प्रणाली असलेल्या लोकांसाठी धोकादायक असू शकते.
हेही वाचा : सावधान! कोरोनानंतर आणखी एक महामारी येतेय? चीनमध्ये HMPV चा उद्रेक, भारताला दक्ष राहावे लागणार का?
एचएमपीव्हीचा प्रसार कसा होतो?
जेव्हा संक्रमित व्यक्ती खोकते किंवा शिंकते तेव्हा सोडलेल्या थेंबांच्या संपर्कात आल्याने. दूषित पृष्ठभागांना स्पर्श केल्यानंतर तोंड, नाक किंवा डोळ्यांना स्पर्श केल्याने संसर्ग होतो.
चीनमध्ये कोविड-सदृश विषाणूची भीती, एचएमपीव्ही म्हणजे काय?
HMPV ची लक्षणे आणि प्रसाराची पद्धत COVID-19 सारखीच आहे. त्यामुळे रुग्णालये आणि आरोग्य सेवेवर ताण वाढला असून, नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. 2001 मध्ये मानवी मेटाप्युमोव्हायरस (HMPV) शोधला गेला. तेव्हापासून, त्याच्या प्रसारामुळे चीन आणि जगाच्या इतर भागांमध्ये घबराट पसरली आहे.
WHO ने अद्याप आणीबाणी जाहीर केली आहे का?
आतापर्यंत, जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि चिनी आरोग्य अधिकाऱ्यांनी उर्वरित जगामध्ये विषाणूच्या प्रसाराशी संबंधित कोणतीही आणीबाणी घोषित केलेली नाही. शिवाय, कोणताही अधिकृत डेटा महामारीसारखी परिस्थिती दर्शवत नाही.
हा विषाणू चीनबाहेरही सापडला आहे का?
क्रिएटिव्ह डायग्नोस्टिक्सवर प्रकाशित झालेल्या एका संशोधन लेखानुसार, एचएमपीव्ही विषाणू युनायटेड स्टेट्स, कॅनडा, युरोप आणि इतर देशांमध्ये आढळला आहे. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, युनायटेड स्टेट्समध्ये 2023 मध्ये hMPV प्रकरणांमध्ये 11 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : तुमचे आरोग्य सांभाळा! जेवणानंतर कधीच करु नका 'या' चुका, नाहीतर होईल शरीराची हानी












Click it and Unblock the Notifications