चीनमध्ये कहर माजवणारा HMPV व्हायरस कसा पसरतो? किती आहे धोकादायक अन् प्रतिबंधात्मक उपाय जाणून घ्या
HMPV Virus India : चीनमध्ये कोविड महामारीच्या पाच वर्षांनंतर मानवी मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) चा उद्रेक आता दिसून येत आहे. मीडिया रिपोर्ट्स आणि सोशल मीडियावर सतत बातम्या येत आहेत की, चीनमध्ये एचएमपीव्ही व्हायरसने कहर केला आहे आणि तेथील रुग्णालयांमध्ये बेडची कमतरता आहे.
काही दावे असेही केले जात आहेत की हा विषाणू कोविडसारखा कहर करू शकतो. यावर भारतीय आरोग्य तज्ज्ञ म्हणाले की या विषाणूबद्दल काळजी करण्याची गरज नाही. भारतात परिस्थिती सामान्य, घाबरण्याची गरज नाही, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की एचएमपीव्ही विषाणू हा नवीन आणि चिंताजनक आजार नाही.

श्वसन सर्दी आणि फ्ल्युची समस्या
आरोग्य मंत्रालयाच्या मते, हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे, यामुळे विशेषत: सर्दी आणि फ्लू सारख्या समस्या उद्भवतात. राष्ट्रीय आजार नियंत्रण संस्थेच्या (NCDC) माहितीनुसार, 2023 मध्ये चीनमध्येही या विषाणूची प्रकरणे नोंदवली गेली होती आणि इतर देशांमध्येही आढळून आली आहे.
हेही वाचा सावधान! कोरोनानंतर आणखी एक महामारी येतेय? चीनमध्ये HMPV चा उद्रेक, भारताला दक्ष राहावे लागणार का?
काय म्हणाले आरोग्य सेवा महासंचालक?
आरोग्य सेवा महासंचालक डॉ. अतुल गोयल म्हणाले की, भारतात या विषाणूमुळे कोणतीही गंभीर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाही. या हिवाळ्याच्या हंगामात भारतात सामान्य श्वसन संक्रमणांची संख्या वाढत आहे, परंतु ही असामान्य किंवा गंभीर परिस्थिती नाही. त्यांनी असेही सांगितले की रुग्णालयांमध्ये खाटा आणि ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा आहे आणि रूग्णांवर उपचार करण्यासाठी विशेष अँटीव्हायरल औषधांची आवश्यकता नाही.
हेही वाचा मानसिक आरोग्य बिघडण्याचे 'हे' आहेत 5 संकेत, वेळीच घ्या डाॅक्टरांचा सल्ला
HMPV ची लक्षणे काय आहेत?
- HMPV हा विषाणू आरएनए विषाणू आहे आणि त्यामुळे न्यूमोनियासारखे गंभीर श्वसनाचे आजार होऊ शकतात. हे सहसा सौम्य श्वसन संक्रमणास कारणीभूत ठरते.
- विशेषत: वृद्ध, मुले आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांमध्ये. चीनमध्ये पसरला प्रादुर्भाव, मृत्यूचे प्रमाणही वाढले चीनमध्ये एचएमपीव्हीच्या वाढत्या रुग्णांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
- मीडिया रिपोर्ट्स आणि सोशल मीडिया असा दावा करत आहेत की हॉस्पिटलमध्ये गर्दी वाढत आहे आणि काही लोक म्हणतात की HMPV मुळे मृत्यूचे प्रमाण देखील वाढत आहे.
- तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हा विषाणू कोविड सारखा बदलू शकत नाही आणि यावेळी त्याच्यामुळे महामारीसारखी परिस्थिती नाही.
हेही वाचा जयपूरमध्ये आढळला गाईच्या शेणाची भेसळयुक्त चहा आणि कॉफी! ,पिण्यापूर्वी खरी की खोटी ओळखायची? वाचा
सुरुवातीची लक्षणे कोणती आणि त्याचा प्रसार कसा होतो?
- एचएमपीव्ही विषाणू एचएमपीव्ही विषाणू खोकताना आणि शिंकण्याद्वारे पसरतो आणि संक्रमित व्यक्तीच्या संपर्कातून विषाणू वेगाने पसरतो.
- याशिवाय हा आजार संक्रमित वस्तूंना स्पर्श करूनही पसरतो.
हेही वाचा या 5 आजारांनी त्रस्त लोकांसाठी वांगी विषापेक्षा कमी नाही, नाहीतर बिघडेल आरोग्य
HMPV विषाणू रोखण्यासाठी उपाय
- HMPV विषाणू रोखण्यासाठी केवळ कोविड दरम्यान अवलंबलेल्या उपायांची अंमलबजावणी केली जाऊ शकते.
- मास्क वापरा, नियमितपणे हात धुवा आणि संक्रमित व्यक्तीशी संपर्क टाळा.
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नका आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
- भारतात या विषाणूमुळे कोणतीही गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही.
- देशभरात श्वसन संसर्गाच्या प्रकरणांवर लक्ष ठेवले जात आहे आणि तज्ञ म्हणतात की या विषाणूबद्दल घाबरण्याची गरज नाही.












Click it and Unblock the Notifications