Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Hmpv prevention tips : जर तुमच्या घरात कोणाला HMPV व्हायरसचा संसर्ग झाला, तर काय करायचे? समजून घ्या

Hmpv prevention tips : ह्युमन मेटापन्यूमो व्हायरसची प्रकरणे अर्थात HMPV भारतातही प्रकाशात येऊ लागली आहेत. ICMR ला कर्नाटकातील बंगळुरू येथे नियमित चाचणी दरम्यान HMPV ची दोन प्रकरणे आढळली आहेत. दोन्ही प्रकरणांमध्ये मुलांमध्ये संसर्ग आढळून आला आहे. तीन महिन्यांची मुलगी आणि आठ महिन्यांचा मुलगा. मात्र, तीन महिन्यांच्या मुलीला उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

भारतात एचएमपीव्ही संसर्गामध्ये वाढ होत असताना, यासंदर्भात एक सूचना जारी करण्यात आली आहे. सध्या काळजी करण्यासारखे काही नाही, असे सरकारने म्हटले आहे. HMPV बाबत सर्व राज्यांना मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. अशा परिस्थितीत, HMPV सह तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी कशी घेऊ शकता ते आपण जाणून घेऊया.

Hmpv prevention tips

Human Meta Pneumo Virus म्हणजे काय?

सायन्स डायरेक्टनुसार, या विषाणूची उत्पत्ती 200 ते 400 वर्षांपूर्वी पक्ष्यांकडून झाली. त्यानंतर, हा विषाणू स्वतःच पुन्हा पुन्हा बदलत आहे आणि आता हा विषाणू पक्ष्यांना संक्रमित करू शकत नाही. 2001 मध्ये मानवांमध्ये याचा शोध लागला. मानवी मेटापन्यूमोव्हायरस किंवा एचएमपीव्ही पहिल्यांदा 2001 मध्ये आढळून आले.

HMPV विषाणू Pneumoviridae कुटुंबाशी संबंधित आहे, जे रेस्पिरेटरी सिंसिटिअल व्हायरस (RSV) सारखीच फॅमिली आहे.

हेही वाचा : सावधान! कोरोनानंतर आणखी एक महामारी येतेय? चीनमध्ये HMPV चा उद्रेक, भारताला दक्ष राहावे लागणार का?

डॉ. अतुल गोयल एचएमपीव्ही व्हायरसबद्दल काय म्हणाले?

भारतीय आरोग्य सेवेचे महासंचालक डॉ. अतुल गोयल यांनी याबाबत सांगितले की, हा एक सामान्य विषाणू आहे. त्यामुळे श्वसनमार्गामध्ये संसर्ग होतो. त्यामुळे सर्दी, ताप, श्वास घेण्यास त्रास होणे असे आजार होऊ शकतात. हे एक वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये आणि वृद्धांमध्ये दिसून येते.

हेही वाचा :

अतुल गोयल यांनी देखील माहिती दिली आहे की, भारतात आतापर्यंत या विषाणूच्या संसर्गाची फारशी प्रकरणे नोंदलेली नाहीत. अतुल गोयल म्हणाले की, यामुळे कोणताही गंभीर आजार होत नाही त्यामुळे कोणीही काळजी करण्याची गरज नाही. हिवाळ्यात सर्दी, ताप, खोकला यासारखे रुग्ण आढळतात. आमची तयारी पूर्ण झाली आहे आणि आमची रुग्णालये परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत.

हेही वाचा : चीनमध्ये कहर माजवणारा HMPV व्हायरस कसा पसरतो? किती आहे धोकादायक अन् प्रतिबंधात्मक उपाय जाणून घ्या

डॉक्टर अतुल गोयल यांनी सांगितले की, आम्ही चीनमधील या व्हायरसच्या डेटावर सतत लक्ष ठेवत आहोत. हा संसर्ग हिवाळा आणि वसंत ऋतूमध्ये होतो. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या विषाणूच्या आकडेवारीत कोणतीही वाढ झाली नव्हती.

एचएमपीव्ही लक्षणे: अशी लक्षणे कोणामध्ये दिसल्यास त्यांनी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

  • खोकला
  • नाक बंद होणे
  • ताप
  • घसा खवखवणे
  • श्वास घेण्यास त्रास होणे
  • संसर्ग आणखी वाढल्यास, या विषाणूमुळे ब्राँकायटिस किंवा न्यूमोनिया होऊ शकतो.

(टीप: अशी लक्षणे तीन दिवस राहिल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या)

एचएमपीव्ही इन्क्यूबेशन कालावधी किती असतो?

या विषाणूचा इन्क्यूबेशन काळ साधारणपणे तीन ते सहा दिवसांचा असतो. परंतु आजारपणाचा कालावधी कमी-अधिक असू शकतो. हे संक्रमण किती गंभीर आहे, यावर अवलंबून आहे. हा नवीन विषाणू नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. 20 वर्षांपासून मानवांना याबद्दल माहिती आहे. हिवाळ्यात त्याच्या संसर्गाची प्रकरणे आढळतात. हे फ्लू विषाणूसारखे आहे.

हेही वाचा : HMPV Virus : भारतात आढळला ह्युमन मोटान्यूनोचा पहिला रुग्ण, चिमुकल्या बाळाला संसर्ग, चीनमध्ये कहर

HMPV चा प्रसार कसा होतो?

  • खोकताना आणि शिंकताना थुंकीच्या कणांद्वारे HMPV पसरतो.
  • याशिवाय हस्तांदोलन, मिठी मारून किंवा एकमेकांना स्पर्श केल्यानेही पसरतो.
  • खोकल्यामुळे किंवा शिंकल्यामुळे लाळेचे कण एखाद्या पृष्ठभागावर पडले तर त्या पृष्ठभागाला स्पर्श केल्यानंतर तुम्ही त्या हाताने तुमचा चेहरा, नाक, डोळे किंवा तोंडाला स्पर्श केला तर हा विषाणू संक्रमित होऊ शकतो.

HMPV टिप्स: स्वतःसाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी या गोष्टी लक्षात ठेवा?

भारतीय आरोग्य सेवा महासंचालक डॉ. अतुल गोयल यांच्या म्हणण्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीला या विषाणूची लागण झाली असेल किंवा कोणालाही सर्दी किंवा खोकला असेल तर सर्वप्रथम त्याच्यापासून अंतर ठेवा. त्यानंतर त्याला डॉक्टरांकडे न्या. सर्दी आणि खोकल्याचा त्रास असलेल्या व्यक्तीला मास्क घालण्यास सांगा.

  • खोकताना किंवा शिंकताना तोंडाला रुमाल किंवा मास्कने झाका.
  • आपले हात वारंवार साबणाने धुवा आणि चेहऱ्याला हात लावू नका.
  • सर्दी, खोकला असल्यास मास्क लावा आणि घरी आराम करा. त्याच भांड्यातून दुसऱ्याने खाऊ नये.
  • तुमची भांडी एकमेकांसोबत शेअर करू नका.

Treatment of HMPV: एचएमपीवीवर उपचार काय आहेत?

एचएमपीवी विषाणूवर सध्या तरी वेगळी अँटी व्हायरल औषधी बनवली अथवा अजून कोणतीही लस बनवण्यात आली नाही. डॉक्टरोंचे म्हणणे आहे की, साधारणतः सर्दी, तापीचीच औषधी दिली जाते.

हेही वाचा : HMPV विषाणूसाठी महाराष्ट्र सरकारची गाईडलाईन, काय करावे काय नको, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+