Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

HMVP व्हायरस! लहान मुलं, वृद्धांची काळजी घ्या! वैद्यकीय स्टाफच्या रजा रद्द कराव्या, मंत्र्याची सूचना

HMVP Take care of children : जगातील अनेक देशांमध्ये हयुमन मेटा न्युमोनिया व्हायरस ( एचएमपीव्ही ) विषाणूचा प्रभाव दिसून येत आहे. आपल्या देशात आज पर्यंत एकून पाच रुग्ण कर्नाटक, तामिळनाडू व गुजरात या राज्यात आढळून आले. त्या पैकी एक रुग्ण पुर्णपणे बरा होवून घरी गेलेला आहे. उर्वरित रुग्ण बरे होत आहेत. हा आजार गंभीर नसून लहान मुलं, वृद्ध आणि इतर गंभीर आजर असणाऱ्यांनी काळजी घ्यावी असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

मंत्रालयीन दालनात एचएमपीव्ही विषाणू संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त राजीव निवतकर, संचालक डॉ अजय चंदनवाले, आयुष विभागाचे संचालक डॉ रमन घुंगराळकर याबरोबरच राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयचे अधिष्ठाता दुरदृष्य प्रणालीव्दारे उपस्थित होते.

HMPV Take care of children elderly

घाबरुन जाऊ नका...

मंत्री मुश्रीफ म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल माध्यमांशी संवाद साधताना सांगितलेले आहे की, काही राज्यांमध्ये एचएमपीव्ही प्रकरणे आढळून आलेली आहेत. परंतू आपल्या राज्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये कारण सरकार लवकरच या परिस्थितीबद्दल सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्वे जारी करुन या रोगाला प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन आळा घालण्यात येईल असे सांगितले.

हेही वाचा : चीनमध्ये कहर माजवणारा HMPV व्हायरस कसा पसरतो? किती आहे धोकादायक अन् प्रतिबंधात्मक उपाय जाणून घ्या

काय म्हणाले वैद्यकीय शिक्षण मंत्री?

  • राज्यात सद्यस्थितीत एकही एचएमपीव्हीचा रुग्ण आढळला नाही. सर्व अधिष्ठातांनी संभाव्य प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी औषधांसह ऑक्सिजन व आवश्यकता वाटल्यास विलगीकरण या साठी तयारीत रहावे. अतिरिक्त व मुबलक औषधीसाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे संपर्क करावे.
  • राज्यात संसर्ग पसरु नये यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे व अधिष्ठातांनी सतर्क राहून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द कराव्या अशा सूचनाही मंत्री मुश्रीफ यांनी दिल्या.

हेही वाचा : HMPV विषाणूसाठी महाराष्ट्र सरकारची गाईडलाईन, काय करावे काय नको, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे

आरोग्य विभागाच्या सूचना

शिंकताना नाक, रुमालने तोंड झाका

या रोगासंबंधी मोठया प्रमाणावर जनजागृती करून नागरिकांना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

प्रतिबंधात्मक उपाय व सतर्कतेचा एक भाग म्हणून नागरिकांना खोकताना किंवा शिंकताना तोंड व नाक रुमालाने नाक व तोंड झाकण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

साबण आणि पाण्याने किंवा सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुणे, ताप व खोकला आणि शिंका अथवा सर्दी पडश्या सारखे लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

रुग्णांनी सार्वजनिक ठिकाणांपासून दूर रहावे व वैद्यकीय सल्यानुसार औषधी, भरपूर पाणी पिणे आणि पौष्टिक आहाराचे सेवन केल्यामुळे या रोगाचा प्रसार कमी होण्यास मदत होईल.

वैद्यकीय शिक्षण विभागाने विशेष करून संशयित रुग्णांपासून दूर राहून सदर रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होईल.

हेही वाचा : नागपूरमध्ये 2 बालकांमध्ये HMPV ची लक्षणे! सॅम्पल तपासणीसाठी प्रयोगशाळेत, अहवालानंतरच तथ्य समजणार

हेही वाचा : Hmpv prevention tips : जर तुमच्या घरात कोणाला HMPV व्हायरसचा संसर्ग झाला, तर काय करायचे? समजून घ्या

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+