Diabetes warning signs: मधूमेहाच्या या 6 लक्षणाकडे चुकूनही दुर्लक्ष करु नका,शुगर का होते? वाचा कारणे
Diabetes Don't ignore these 6 warning signs : शुगर अर्थात मधुमेह हा सहज वाटणारा जरी आजार असला तरीही ही व्याधी फारच त्रासदायक असते. भारतात तर मधुमेहाच्या रुग्णांत वाढ होत आहे. आधी हा आजार वृद्धांमध्ये दिसून यायचा पण आता युवा वर्गातही हा आजार वाढताना दिसतो.
२०२१ मध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार, चीननंतर भारतात जास्त डायबेटीजचे रुग्ण वाढत असल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. धाकाधकीचे जीवन, स्पर्धा आणि त्यातून होणारा ताण-तणाव, चुकीची जीवनशैली आदी गोष्टी या आजाराला कारणीभूत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

भारतात मधुमेह वाढण्याची कारणे काय आहेत?
भारतात, विशेषतः तरुण पिढीमध्ये, मधुमेहाचे (Diabetes) प्रमाण वेगाने वाढत आहे. याची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत:
बदलती जीवनशैली: बैठी जीवनशैली (sedentary lifestyle) आणि शारीरिक हालचालींचा अभाव.
प्रक्रिया केलेल्या अन्नाचा वापर : प्रक्रिया केलेले आणि साखरयुक्त पदार्थांचे (processed foods) वाढते सेवन.
मधुमेहाची सुरुवातीची 6 लक्षणे
मधुमेह शरीरात हळूहळू वाढतो आणि अनेकदा त्याची लक्षणे लगेच लक्षात येत नाहीत. त्यामुळे, ही सुरुवातीची लक्षणे ओळखणे महत्त्वाचे आहे.
1. वारंवार तहान आणि कोरडे
जर तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त वारवार तहान लागत असेल आणि तोंड सुकणे. याचे कारण म्हणजेत रक्तातील साखरेचे असंतुलन शरीरातील पाण्याच्या पातळीवर परिणाम करते.
2. वारंवार लघवी होणे
वाढलेली साखर शरीराबाहेर काढण्यासाठी मूत्रपिंड जास्त काम करतात, त्यामुळे वारंवार लघवी लागते.
3. अचानक वजन घटणे
जर तुम्ही डाएट केले नाही तरीही वजन घटत असेल तर हे चिंतेचे कारण आहे. शरीराला ऊर्जा मिळत नसल्याने चरबी कमी होते आणि स्नायूंवरही परिणाम होतो.
4. थकवा आणि चिडचिड
शरीराला योग्य प्रमाणात ऊर्जा न मिळाल्याने थकवा आणि मूड स्विंग होतो. थकवा जाणवल्यानंतर मनावरही तणाव जाणवतो.
5. धूसर दृष्टी
रक्तातील साखरेच्या पातळीत असंतुलन निर्माण झाले तर त्याचा डोळ्यांच्या नसांवर परिणाम होतो. त्यामुळे अंधुक दिसण्याची शक्यता असते.
6. जखम लवकर न भरणे
मधुमेहामुळे शरीराची प्रतिकारशक्ती (Immunity) कमकुवत होते. यात वारवार संक्रमण होणे आणि जखमही लवकर भरत नाही.
(Disclaimer : हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. जाणीवजागृती आणि ज्ञानासाठी आहे. जर आपल्याला उपचार घ्यायचे असेल तर तज्ज्ञ डाॅक्टरांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा : E Ayushman Vay Vandana: आयुष्मान कार्ड कसे डाऊनलोड करावे, 5 लाख रुपयांचे आरोग्य विमा कवच कसे मिळवावे?
हेही वाचा : 34 व्या वर्षी 'या' अभिनेत्याला हार्टअॅटॅक! ऐन तारुण्यात का येतो हृदयविकाराचा झटका? जाणून घ्या












Click it and Unblock the Notifications