22 नोव्हेंबरच्या 'त्या' रात्री नेमकं काय घडलं? स्मृती मंधाना आणि पलाशचं लग्न का मोडलं? समोर आलं सत्य
Smriti Mandhana-Palash Muchhal : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधाना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नाची चर्चा संपूर्ण देशात होती. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी महाराष्ट्रातील सांगली येथे हा विवाहसोहळा पार पडणार होता. सर्व तयारी झाली होती, पाहुणेही पोहोचले होते, मात्र ऐनवेळी हे लग्न मोडले. या घटनेला आता काही महिने उलटले असले तरी, त्या रात्री नेमकी काय परिस्थिती होती, याचा खुलासा आता एका प्रत्यक्षदर्शीने केला आहे.

२२ नोव्हेंबरच्या 'त्या' रात्रीचा खुलासा
प्रसिद्ध टीव्ही अभिनेता नंदीश संधू, जो या लग्नासाठी सांगलीला पोहोचला होता, त्याने एका मुलाखतीत त्या रात्रीचा घटनाक्रम सांगितला आहे. नंदीशच्या म्हणण्यानुसार, "मी लग्नासाठी पोहोचलो होतो, पण तिथे गेल्यावर कळले की लग्न होणार नाहीये. स्मृती मंधानाने स्वतः सर्व पाहुण्यांना सांगितले होते की, तिच्या वडिलांची प्रकृती अचानक खूप खालावली आहे आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. याच कारणामुळे लग्न टाळण्यात आले."
धोका दिल्याचे आरोप आणि वास्तविकता
लग्न मोडल्यानंतर सोशल मीडियावर पलाश मुच्छलवर स्मृतीला 'धोका' दिल्याचे गंभीर आरोप करण्यात आले होते. मात्र, स्मृतीने कधीही सार्वजनिकपणे यावर भाष्य केले नाही किंवा फसवणुकीचा शब्दही काढला नाही. नंदीश संधूने या आरोपांवर भाष्य करण्यास नकार दिला असून, "पलाशला देखील त्याची बाजू मांडू द्यावी, सध्या काहीही बोलणे योग्य ठरणार नाही," असे म्हटले आहे.
सच्च्या प्रेमाची साक्ष
नंदीश भावूक होत पुढे म्हणाला की, "मी गेल्या अनेक वर्षांपासून त्या दोघांमधील प्रेम जवळून पाहिले आहे. कारण काहीही असो, ते एक सुंदर जोडपे होते." स्मृतीने काही दिवसांनंतर सोशल मीडियावर हे लग्न आता होणार नसल्याचे स्पष्ट केले होते, ज्यामुळे चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. आजही या प्रकरणातील नेमके सत्य काय, हे एक गुड बनून राहिले आहे.
हेही वाचा : स्मृती मानधनासोबतचं नातं व 'बेवफाई'चे आरोप; पलाश मुच्छल आक्रमक, या व्यक्तीवर मानहानीचा ठोकला खटला
हेही वाचा : मैदानावर विक्रमी 'तबाही' अन् खासगी आयुष्यात 'वेदना'; स्मृती मंधानाची ती भावुक पोस्ट, पाहा- Video
हेही वाचा : स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलचे लग्न रद्द! स्टार क्रिकेटरने मौन सोडले, म्हणाली- पुढे जाण्याची...
हेही वाचा : स्मृती मानधना-पलाश मुच्छाल प्रकरणावर RJ महवशनं साधला निशाणा, नेटकऱ्यांकडून तीव्र प्रतिक्रिया!












Click it and Unblock the Notifications