स्मृती मानधना-पलाश मुच्छाल प्रकरणावर RJ महवशनं साधला निशाणा, नेटकऱ्यांकडून तीव्र प्रतिक्रिया!
RJ Mahvash Faces Backlash Over Insensitive Dig at Palash Muchhal : क्रिकेटर स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छाल यांच्या पुढे ढकललेल्या लग्नावरून सुरू असलेल्या चर्चांमध्ये आता RJ महवशने केलेल्या एका व्हिडिओमुळे सोशल मीडियावर मोठा गदारोळ माजला आहे. पलाशवर विश्वासघात केल्याच्या अफवा पसरलेल्या असतानाच, महवशने 'चीटिंग' आणि 'विश्वास' या विषयावर एक व्हिडिओ पोस्ट केला. अनेक नेटकऱ्यांनी तिच्या या टिप्पणीला 'असंवेदनशील' म्हणत टीका केली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छाल यांचा विवाह सोहळा २३ नोव्हेंबर रोजी स्मृती यांच्या वडिलांच्या तब्येतीमुळे पुढे ढकलण्यात आला. यानंतर सोशल मीडियावर या जोडप्याबद्दल अनेक अफवा पसरू लागल्या, ज्यात पलाशने स्मृतीची फसवणूक केल्याचेही आरोप होते.
याच पार्श्वभूमीवर, RJ महवशने तिच्या व्हिडिओमध्ये विनोदी शैलीत पुरुषांवर टीका करत, 'चीटिंग' करणाऱ्यांबाबत महिलांना आवाहन केले. तिने म्हटले, "मला खरं-खोटं माहीत नाही, पण माझ्या लग्नाच्या वेळी, मी माझा नवरा एक आठवडा आधी इंटरनेटवर 'लाँच' करणार नाही... आणि माझा नवरा जर कोणाच्याही DM मध्ये 'सुहागरात' बनवत असेल, तर मुलींनो, येऊन मला सांगा... तो माझ्यावर विश्वास ठेवते म्हणून काही होणार नाही, असं समजू नका. मी जगात कोणावरही विश्वास ठेवत नाही. कोणीही काहीही करू शकतं. तुम्ही त्याचे डायरेक्ट मेसेज (DM) पब्लिक करा किंवा मला द्या, मी पब्लिक करेन... वाचवा रे दोस्तों... प्लीज गर्ल्स तुम्हारे हवाले वतन साथियो."
नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
महवशने थेट नाव न घेता हे विधान केले असले तरी, तिचा रोख स्मृती आणि पलाशच्या व्हायरल होत असलेल्या अफवांकडेच होता असे अनेकांना वाटले. यावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. एका युजरने म्हटले की, "आजकाल लोक इतके असंवेदनशील कसे झाले आहेत? आपल्या मनोरंजनासाठी अशा गोष्टींवर विनोद करणे, विशेषतः जेव्हा ती (स्मृती मानधना) आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करते आणि वर्ल्ड कप जिंकून आणला आहे!"
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छाल या दोघांनीही या अफवांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. वडिलांच्या तब्येतीमुळे लग्न पुढे ढकलल्याचे त्यांनी स्पष्ट केले असले तरी, त्यांच्या मौनामुळे चर्चांना अधिक उधाण आले आहे.
-
Eid ul Fitr 2026 : यंदा रमजान ईद कधी? सुट्टीची तारीख कोणती असेल; जाणून घ्या सविस्तर माहिती -
आजचे राशीभविष्य: सोमवार १६ मार्च २०२६, 'या' राशींना होणार प्रचंड धनलाभ; पाहा तुमची रास! -
LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी! गॅस सप्लाय बंद होण्याची भीती वाटतेय? घरबसल्या करा e-KYC 'ही' सोपी पद्धत -
गुढी कशी उभारावी? वाचा शास्त्रोक्त पूजा-विधी, शुभ मुहूर्त, मंत्र आणि आरती; करा नववर्षाचे स्वागत -
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
Rajya Sabha Election 2026 Result : राज्यसभेच्या 37 जागांचा निकाल; पाहा विजेत्यांची यादी -
अदानी टोटल गॅसकडून औद्योगिक ग्राहकांसाठी अतिरिक्त नैसर्गिक वायूच्या दरात कपात -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
Gold silver price today : सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात मोठी घसरण; वाचा ताजे दर -
Oscars 2026 Winners : ऑस्कर पुरस्कारांची घोषणा हा चित्रपट ठरला सर्वात भारी; पाहा संपूर्ण विनर लिस्ट -
हरीश राणांना कसा दिला जाणार 'इच्छामृत्यू'? व्हेंटीलेटर हटवणे ते अखेरच्या श्वासापर्यंत काय घडतं? वाचा










Click it and Unblock the Notifications