मैदानावर विक्रमी 'तबाही' अन् खासगी आयुष्यात 'वेदना'; स्मृती मंधानाची ती भावुक पोस्ट, पाहा- Video
Smriti Mandhana Shares Emotional Post : भारतीय महिला क्रिकेटची 'क्वीन' म्हणून ओळखली जाणारी स्मृती मंधाना हिच्यासाठी २०२५ हे वर्ष संमिश्र भावनांचे ठरले. एकीकडे तिने क्रिकेटच्या मैदानावर धावांचा पाऊस पाडत एकामागून एक जागतिक विक्रम मोडीत काढले.
तर दुसरीकडे वैयक्तिक आयुष्यात तिला मोठ्या दुःखाचा सामना करावा लागला. वर्षाच्या शेवटी स्मृतीने शेअर केलेल्या एका व्हिडिओने चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.

मैदानावर ऐतिहासिक कामगिरी
२०२५ हे वर्ष स्मृतीच्या बॅटिंगमधील ताकदीचे साक्षीदार ठरले. तिने या वर्षात जे साध्य केले, ते आजवर कोणत्याही महिला क्रिकेटपटूला जमले नव्हते.
धावांचा डोंगर : स्मृतीने तिन्ही फॉरमॅट मिळून तब्बल १७०३ धावा कुटल्या. विशेष म्हणजे, पुरुष क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या शुभमन गिलच्या (१७६४ धावा) ती अगदी जवळ पोहोचली.
सिक्सर किंग : वनडे क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक ३२ षटकार ठोकण्याचा विक्रम तिने आपल्या नावावर केला.
सर्वात वेगवान शतक : ऑस्ट्रेलियासारख्या तगड्या संघाविरुद्ध तिने अवघ्या ५० चेंडूत वनडे शतक ठोकले. हे भारतकडून (पुरुष आणि महिला दोन्हीमध्ये) सर्वात वेगवान वनडे शतक ठरले आहे.
विराट विक्रम : एका कॅलेंडर वर्षात वनडेमध्ये १००० हून अधिक धावा करणारी ती जगातील पहिली महिला ठरली. तिने या वर्षात ६ आंतरराष्ट्रीय शतके झळकावली.
खाजगी आयुष्यात मोठी जखम: पलाश मुच्छलसोबतचं नातं तुटलं?
मैदानावर प्रतिस्पर्धी गोलंदाजांची धुलाई करणारी स्मृती वैयक्तिक आयुष्यात मात्र एका मोठ्या भावनिक संकटातून जात आहे. संगीतकार पलाश मुच्छल आणि स्मृती यांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या होत्या, मात्र स्मृतीने शेअर केलेल्या व्हिडिओमधून काही वेगळेच संकेत मिळत आहेत.
लग्नाच्या दिवशीच विखुरलं स्वप्न : सूत्रांनुसार, ज्या दिवशी विवाह होणार होता, त्याच वेळी हे नाते तुटले.
स्मृतीची पोस्ट : तिने शेअर केलेल्या 'इयर एंड' व्हिडिओमध्ये कुटुंब आणि मित्र दिसत आहेत, मात्र पलाशचा एकही फोटो किंवा क्लिप नाही. तिने जुन्या आठवणी मागे सोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट दिसत आहे.
भगवद्गीतेचा आधार आणि भावुक संदेश
व्हिडिओच्या शेवटी स्मृती अत्यंत भावुक दिसली. तिने भगवान श्रीकृष्णाचे स्मरण करत भगवद्गीतेतील एक ओळ लिहिली: "जेव्हा तुमच्यासोबत काहीतरी खूप चांगले घडणार असते, तेव्हा सर्वकाही विखुरल्यासारखे वाटू लागते." तिच्या या ओळीतून तिच्या मनातील अस्वस्थता आणि देवावर असलेला विश्वास अधोरेखित होतो. सोशल मीडियावर तिचे चाहते तिला धीर देत असून, "तू केवळ एक महान क्रिकेटपटू नाहीस, तर एक प्रेरणादायी व्यक्ती आहेस," अशा कमेंट्स करत आहेत.












Click it and Unblock the Notifications