Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Saif ali khan : सरकार सैफ अली खानची 15 हजार कोटींची मालमत्ता जप्त करणार! वाचा नेमकं काय झालं?

Saif ali khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. 16 जानेवारी 2025 रोजी अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या घटनेत ते गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सैफ अली खानची कौटुंबिक संपत्ती जप्त होणार

दरम्यान, मध्य प्रदेश सरकार लवकरच अभिनेता सैफ अली खानच्या कौटुंबिक संपत्तीचा ताबा घेऊ शकते. ज्याची किंमत 15 हजार कोटी रुपये आहे, अशी बातमी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भोपाळ राज्यातील ऐतिहासिक संपत्तीवर 2015 पासून लादलेली बंदी उठवण्यात आली आहे.

Saif ali khan

पतौडी कुटुंबाची मालमत्ता 'शत्रूची मालमत्ता'

अशा परिस्थितीत सैफ अली खानची फ्लॅग स्टाफ हाऊस, नूर-उस-सबाह पॅलेस, दार-उस-सलाम, हबीबी का बंगला, अहमदाबाद पॅलेस, कोहेफिजा प्रॉपर्टी आणि इतर मालमत्ता स्कॅनरच्या कक्षेत आल्या आहेत. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश विवेक अग्रवाल यांनी 13 डिसेंबर 2024 रोजी बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानची याचिका फेटाळली होती, ज्यात त्याने भोपाळमधील पतौडी कुटुंबाची मालमत्ता 'शत्रूची मालमत्ता' म्हणून घोषित करण्याच्या सरकारी नोटिसविरोधात तक्रार केली होती.

हेही वाचा : Saif Ali Khan : सैफ अली खानवरील हल्ल्याचे खरे कारण काय? CM फडणवीस म्हणाले - सर्वकाही उघड झालंय

सैफ अली खानकडून अद्याप अपील नाही

न्यायालयाने सैफ अली खानला अपील करण्याची परवानगी दिली होती, मात्र या प्रकरणी त्याने किंवा त्याच्या कुटुंबीयांनी अद्याप अपील दाखल केलेले नाही. अशा परिस्थितीत, न्यायालयाने म्हटले आहे की, आजपासून 30 दिवसांच्या आत कोणतेही प्रतिनिधित्व दाखल केले असल्यास, अपील अधिकारी मर्यादेच्या पैलूकडे लक्ष देणार नाही आणि त्याच्या गुणवत्तेनुसार अपील निकाली काढेल.

मध्य प्रदेश सरकारने यापूर्वीच घोषणा केली होती की भोपाळच्या शेवटच्या नवाबच्या मालमत्ता राज्य - शत्रू मालमत्ता कायदा, 1968 अंतर्गत अधिग्रहित करेल. सूत्रांनी सांगितले की, पतौडी कुटुंबाची भोपाळमध्ये 15 हजार कोटी रुपयांची मालमत्ता आहे, जी सैफ अली खान आणि शर्मिला टागोर यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात आहे. त्याचा विस्तार कोहेफिजा ते भोपाळमधील चिक्लोडपर्यंत आहे.

हेही वाचा : बांगलादेशी असल्याचा संशय! 6 महिन्यांपूर्वी मुंबईत, सैफ अली खानवर हल्ला करणारा कोण? वाचा सर्व डिटेल्स

सैफ अली खानला कायदेशीर अडचण

  • सैफ अली खानसाठी ही कायदेशीर अडचण 2014 मध्ये सुरू झाली जेव्हा शत्रू मालमत्ता विभागाच्या अभिरक्षकाने भोपाळमधील पतौडी कुटुंबाची मालमत्ता शत्रूची मालमत्ता म्हणून घोषित करणारी नोटीस जारी केली होती.
  • सैफ अली खानने 2015 मध्ये या नोटीसला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते आणि संपत्तीवर स्थगिती मिळवली होती. तथापि, 13 डिसेंबर 2024 रोजी उच्च न्यायालयाने स्थगिती उठवली आणि त्यांची याचिका फेटाळली.
  • उच्च न्यायालयाने सैफ अली खान आणि त्याच्या कुटुंबाला मालमत्ता परत मिळवण्यासाठी अपीलीय न्यायाधिकरणाकडे जाण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली होती.
  • डेडलाइन संपल्यानंतरही सैफ अली खानच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने अद्याप कोणताही दावा केलेला नाही. कायदेशीर प्रक्रियेनुसार, सरकार आता या मालमत्ता आपल्या नियंत्रणाखाली घेऊ शकते, ज्यामध्ये भोपाळ जिल्हा प्रशासन कार्यवाहक प्राधिकरण आहे.

    हेही वाचा : सैफ अली खानला 6 दिवसांनी डिस्चार्ज! करीना-शर्मिला अन् सारासोबत हॉस्पिटलमधून घरी परतला

    शत्रू मालमत्ता कायदा 1958 काय आहे?

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+