Saif Ali Khan case : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याला अटक! आरोपी हाॅटेलमधील वेटर, गुन्हा केला कबूल
Saif Ali Khan case : अभिनेता सैफ अली खान मुंबईत या हल्ल्यासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी संशयित आरोपी विजय दास याला रविवारी पहाटे ठाण्यातून अटक केली असून, त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपी विजय दास हा एका रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम करतो.
बारमध्ये हाऊस किपिंगचे काम..!
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी विजय दास हा ठाण्यातील रिकी बारमध्ये हाऊसकीपिंग कामगार म्हणून काम करत होता. सध्या पोलिस त्याची चौकशी करत असून सकाळी नऊ वाजता पत्रकार परिषदेत याप्रकरणी सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

संशयित वांद्रे पोलिसांच्या ताब्यात
आरोपीला वांद्रे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याला न्यायालयात हजर करून पोलिस कोठडी मागितली जाणार आहे. आरोपींच्या अटकेने या प्रकरणाचा उलगडा होईल, अशी आशा पोलिसांना आहे. 16 जानेवारीच्या रात्री, अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या घरात घुसून हल्ला करण्यात आला. चोरीच्या इराद्याने आरोपींनी घरात घुसून सैफ अली खानवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. त्यांना तातडीने मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सैफ अली खानचे कुटुंबीय आणि कर्मचाऱ्यांचे जबाबही नोंदवले आहेत.
Maharashtra | Saif Ali Khan attack case | The arrested accused, Vijay Das, a waiter at a restaurant, has confessed to having committed the crime: Mumbai Police
— ANI (@ANI) January 18, 2025
(Picture confirmed by Mumbai Police) https://t.co/HyE8wE5dYQ pic.twitter.com/L2XHt5pIbd
पोलिसांनी जारी केले सीसीटीव्ही फुटेज
हल्ल्याच्या काही तासांनंतर, मुंबई पोलिसांनी इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज जारी केले ज्यामध्ये आरोपी पायऱ्या उतरताना दिसत आहेत. त्याआधारे पोलिसांनी शुक्रवारी एका संशयिताला ताब्यात घेतले होते, मात्र चौकशीनंतर तो हल्लेखोर नसल्याची खात्री झाली.
#WATCH | Mumbai, Maharashtra | Saif Ali Khan attack case | The arrested accused has been kept in detention at Khar Police Station. Visuals from outside the police station. pic.twitter.com/J1rMYhjUbD
— ANI (@ANI) January 19, 2025
आता पोलिसांनी ठाण्यातून आणखी एका आरोपीला अटक केली आहे. याशिवाय दुर्ग आरपीएफने शालिमार ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसच्या जनरल बोगीतून सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या संशयिताला ताब्यात घेतले आहे. आरपीएफचे प्रभारी संजीव सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी पाठवलेल्या छायाचित्राच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.












Click it and Unblock the Notifications