Saif Ali Khan : सैफ अली खानवरील हल्ल्याचे खरे कारण काय? CM फडणवीस म्हणाले - सर्वकाही उघड झालंय

Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्याच घरात चाकू हल्ला झाल्याच्या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे. काल रात्री 2.30 वाजता मुंबईतील वांद्रे येथील सैफ अलीच्या घरात एका चोराने प्रवेश केला आणि अभिनेत्यावर धारदार चाकूने सहा वार केले. ज्यामध्ये अभिनेता गंभीर जखमी झाला असून त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Saif Ali Khan

सैफ अली खानवरील हल्ल्याच्या घटनेनंतर मुंबई पोलिस आणि महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस सरकार लोकांच्या निशाण्यावर आले आहे. महाराष्ट्रातील फडणवीस सरकारच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. मात्र, सैफवरील हल्ल्यावर सीएम फडणीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमके काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याशी संबंधित सर्व माहिती पोलीस तुम्हाला देत आहेत. हा कोणत्या प्रकारचा हल्ला होता हे पोलिसांनी सांगितले. वास्तविक, यामागचे कारण काय, हल्ल्यामागचा हेतू काय होता, हे सर्व तुमच्यासमोर आहे.

कसा झाला सैफ अली खानवर हल्ला?

सैफ अली खान व करिना कपूर हे वांद्रे येथील सदगुरु अपार्टमेंटध्ये बाराव्या मजल्यावर राहतात. काल रात्री उशीरा सैफ अली खानच्या घरी अज्ञाताने प्रवेश केला. त्याच्या मोलकरणीसोबत वाद घातला. जेव्हा सैफने हस्तक्षेप केला तेव्हा, त्या व्यक्तीने सैफवर चाकूने हल्ला केला. त्यात सैफ गंभीर जखमी झाला. त्यानंतर पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डाॅक्टर काय म्हणतात?

लीलावती रुग्णालयाचे सीओओ डाँ. नीरज उत्तमनी यांनी उपचाराबाबत माहिती दिली. ते म्हणाले, सैफवर सहा जखमा आहेत. त्यापैकी दोन जखमा खोलवर आहेत. एक जखम मणक्याजवळ आहे. त्याच जखमेसाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर ती जखमी किती खोल आहे आणि आणखी काय आहे हे कळेल. सैफच्या मानेवरही हल्ला झाला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+