Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सैफ अली खानला 6 दिवसांनी डिस्चार्ज! करीना-शर्मिला अन् सारासोबत हॉस्पिटलमधून घरी परतला

Saif Ali Khan discharged from hospital : चाकू हल्ल्यानंतर सैफ अली खानला रुग्णालयातून आज सुट्टी मिळाली आहे. आज दुपारी तीन वाजता डॉक्टरांनी सैफला डिस्चार्ज दिला. सैफची पत्नी करीना कपूर आणि मुलगी सारा त्याला रुग्णालयातून घरी आणले आहे. सहा दिवसांनंतर सैफ अली खानला आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे.

सैफ अली खानसोबत 16 जानेवारीला घटना

16 जानेवारी रोजी सैफ अली खानवर त्याच्या घरात घुसखोराने चाकूने हल्ला केला होता. आरोपींनी अभिनेत्यावर सहा वेळा हल्ला केला होता. तेव्हापासून सैफ मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या मणक्यात अडकलेला अडीच इंच चाकूचा तुकडा डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून काढला. अभिनेत्याच्या प्रकृतीत आता बरीच सुधारणा झाली आहे. त्यामुळे त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Saif Ali Khan discharged from hospital

सैफ अली खान पत्नी करीना मुलगी सारासोबत घरी परतला

सैफ अली खानची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूर आणि मुलगी सारा अली खान त्याला रुग्णालयातून घरी आणण्यासाठी पोहोचल्या आहेत. सैफ सहा दिवसांनंतर त्याच्या घरी परतत आहे. डॉक्टरांनी सैफला फक्त विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे आणि त्याला काम करण्यास मनाई केली आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफ अली खान सतगुरू शरण जाण्याऐवजी फॉर्च्युन हाईट्सला जात आहे. सैफचे अपार्टमेंट सतगुरु शरण बिल्डिंगमध्ये आहे, येथेच अभिनेत्यावर हल्ला झाला होता.

सैफला बरे होण्यासाठी महिना लागणार

या घटनेनंतर सैफ अली खानच्या घराची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. त्याच्या घरात अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत. सध्या वायरिंगचे काम सुरू आहे. डक्ट बंद करण्याचेही काम सुरू आहे. सैफ अली खानचे ऑपरेशन आणि उपचार करणाऱ्या 4 डॉक्टरांच्या टीमने सैफ चालण्यास सक्षम असल्याचे सांगितले आहे. तो बोलण्यास सक्षम आहे परंतु त्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी एक महिना लागेल. सैफ अली खानच्या ज्या भागात आरोपीने वार केले होते त्यात चाकूचा अर्धा भाग तुटला होता, त्या भागावर कॉस्मेटिक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे सैफला पुर्णपणे बरे होण्यास सुमारे एक महिना लागणार आहे.

सैफ अली खानला 'या' गोष्टींची घ्यावी लागेल काळजी

  • डॉक्टरांनी सैफला वजन उचलण्यास मज्जाव केला आहे.
  • यासह जिम आणि शूटिंग करण्यास मनाई केली आहे.
  • पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला सैफला डाॅक्टरांनी दिला आहे.
  • वेळोवेळी सामान्य शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांकडे फाॅलोअपसाठी त्याला जावे लागणार आहे.

पोलिसांनी सैफच्या घरी क्राइम सीन

संशयित आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला घेऊन घटनास्थळी अर्थात सैफ अली खानच्या घरी गुन्ह्याचे दृश्य (क्राइम सीन) पुन्हा तयार केला. यावेळी संपूर्ण बिल्डिंगमध्ये सैफ अली खानच्या घराचा फक्त मागचा दरवाजा उघडा होता आणि सीसीटीव्हीही बंद असल्याचे समोर आले. सध्या पोलिस या प्रकरणाच्या तळापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+