Raid 2 Box Office Collection : रेड 2 पुढे टाॅम क्रूझची जादू चालली नाही, 17व्या दिवशी रेडची एवढी कमाई
Raid 2 Box Office Collection Day 17 : दिग्गज अभिनेता अजय देवगणचा रेड - 2 सिनेमा बाॅक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अशातच प्रसिद्ध हाॅलीवूड अभिनेता टाॅम क्रूझ याचा इम्पाॅसिबल हा सिनेमाही काल अर्थात 17 मे रोजी प्रदर्शित झाला. त्यामुळे असे वाटत होते की, बाॅलीवूड आणि हाॅलीवूडच्या या दोन सिनेमात टस्सल होईल पण तसे घडले नाही.
1 मे रोजी प्रदर्शित झालेला अजय देवगणचा चित्रपट रेड - 2 बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करताना दिसतोय. अशातच गेल्या 17 दिवसांपासून चित्रपटाची कमाई चांगली सुरू आहे. चित्रपटाची कमाई कामाच्या दिवशी कमी होत असली तरी, आठवड्याच्या शेवटी ती वाढत असते. दरम्यान टॉम क्रूझचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'इम्पॉसिबल' 17 मे रोजी प्रदर्शित झाला. त्यानंतर रेड - 2 च्या कमाईवरही परिणाम होईल अशी अपेक्षा होती. पण तसे झालेले नाही.

टाॅम क्रुझ दिग्गज अभिनेता तर आहेतच पण त्याचेही भारतात चाहते आहेत. त्याच्या चित्रपटासाठी प्रेक्षक वाट पाहून असतात. त्याचा सिनेमा शुक्रवारी 17 मे रोजी प्रदर्शित झाला. त्यातच आज 17 व्या दिवशीही अजय देवगणच्या रेड -2 चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली मजबूत पकड दाखवली. त्यामुळे आता जरी टाॅम क्रुझच्या सिनेमाने रेड-2 च्या कमाईवर परिणाम झाला नाही तरीही आगामी काळात रेड -2 चा आर्थिक प्रवास कसा राहील हे पाहणे महत्वाचे ठरेल.
आज 17 व्या दिवशी रेड-2 ने किती केली कमाई?
sacnilk.com च्या अहवालात, रेड-2 चित्रपटाने केलेल्या कमाईविषयी माहिती देण्यात आली आहे. 17 व्या दिवशी रेड-2 ने 4.15 कोटी रुपये कमावले. तर, 16 व्या दिवशी चित्रपटाने 3 कोटी रुपये कमाई केली.
- 14 व्या दिवशी 3.25 कोटी रुपये
- 13 व्या दिवशी 3.76 कोटी रुपये
- 12 व्या दिवशी 5 कोटी रुपये
- 11 व्या दिवशी 11.75 कोटी रुपये
- 10 व्या दिवशी 8.25 कोटी रुपये
- 9व्या दिवशी 5 कोटी रुपये
- 8व्या दिवशी 5.25 कोटी रुपये
- 7व्या दिवशी 4.75 कोटी रुपये
- 6व्या दिवशी 6.92 कोटी रुपये
- 5व्या दिवशी 5.72 कोटी रुपये
- चौथ्या दिवशी 21.25 कोटी रुपये
- तिसऱ्या दिवशी 18 कोटी रुपये
- दुसऱ्या दिवशी 12 कोटी रुपये
- पहिल्या दिवशी 18.25 कोटी रुपये कमाई
टॉम क्रुझच्या इम्पॉसिबल सिनेमानेहीपहिल्या दिवशी 17 कोटी रुपये कमावले आहेत. व्यापार तज्ज्ञांचे म्हणणे आहे की अजय देवगणचा रेड - 2 लवकरच 150 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल. सध्या, रेड -2 ने सिंघम अगेनचा आयुष्यभराचा विक्रमही मोडला आहे.
हेही वाचा : Manoj Kumar Death:जेव्हा लाल बहादूर शास्त्रींच्या विनंतीवरुन मनोज कुमारांनी सिनेमा बनवला वाचा किस्सा
हेही वाचा : Sikandar Movie online leaked : सिकंदरच्या निर्मात्यांना मोठा धक्का! सिनेमा रिलिज होताच ऑनलाइन लिक
हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांनाही काढायचायं सिनेमा! म्हणाले - माझ्या सिनेमात अनेकांचे मुखवटे फाटतील












Click it and Unblock the Notifications