Sikandar Movie online leaked : सिकंदरच्या निर्मात्यांना मोठा धक्का! सिनेमा रिलिज होताच ऑनलाइन लिक
Sikandar movie online leaked : सलमान खान आणि रश्मिका मंदाना यांचा बहुचर्चित सिकंदर चित्रपत्र सिकंदर अखेर प्रदर्शित झाला. हा चित्रपट ईदच्या पार्श्वभुमीवर रिलीज झाला. हा चित्रपट 30 मार्च रोजी रिलीज होण्याच्या काही तास आधी ऑनलाइन लीक झाला होता.
वनइंडिया हिंदीने सिकंदरसंदर्भात वृत्त दिले आहे. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाची एचडी क्वालिटी प्रिंट इंटरनेटवर उपलब्ध झाली आहे. सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना यांच्या सिकंदर या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. पण चित्रपट प्रदर्शित होताच तो ऑनलाइन लीक झाला, ज्यामुळे निर्मात्यांना मोठा धक्का बसला.

चित्रपट ट तमिलरॉकर्स, मूव्हीरुल्झ, फिल्मझिला आणि टेलिग्राम ग्रुप सारख्या प्लॅटफॉर्मवर विनामूल्य पाहता येतात. आता सिकंदर लीक झाल्यामुळे सिकंदरच्या कमाईवर परिणाम होऊ शकतो का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा : सलमान 59 तर रश्मिका मंदान्ना 28 वर्षांची! जाणून घ्या तिचे वडिल कोण, कुटुंब, शिक्षण, प्रियकाराबद्दल
काय सांगतात तज्ज्ञ?
व्यापार विश्लेषक कोमल नाहटा यांनी या चित्रपटाच्या लीकसंदर्भात नाराजी व्यक्त केली एक्सवर म्हटले की, 600 हून अधिक वेबसाइट्सवरून चित्रपट काढून टाकण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत नुकसान झाले होते. हे निंदनीय कृत्य आहे, ज्यामुळे सलमानच्या चित्रपटाचे मोठे नुकसान होऊ शकते!" असे म्हटले आहे.
हेही वाचा : सलमान खान-रश्मिकाच्या चित्रपट किती कमाई करु शकतो? सिकंदर हिट ठरेल का छावाचा रेकाॅर्ड मोडेल का? वाचा
जेव्हा सिकंदरचा ट्रेलर रिलिज झाला होता तेव्हा सोशल मीडियावर सिकंदरची फॅन्सनी खूप वाहवा केली. त्यानंतर धडाधड् बुकींगही सुरु झाली. ज्यामुळे निर्मात्यांना खूप फायदा झाला. गेल्या वर्षी सलमान खानने फिल्म सिकंदरची घोषणा केली होती तर सिकंदर या चित्रपटाचे दिग्दर्शन एआर मुरुगोदास यांनी केले आहे. फॅन्सला अजूनही आशा आहे की, हा चित्रपट ब्लाॅक बस्टर होईल. याचे कारण हेही आहे की, या चित्रपटात रश्मिका मंदाना आणि सलमान खान पहिल्यांदा एकत्र पडद्यावर दिसत आहेत. आता सिकंदर ऑनलाइन लीक झाल्यानंतर हा चित्रपट हिट होतो की नाही हे पाहायचे आहे.
Credits - OneIndia Hindi












Click it and Unblock the Notifications