देवेंद्र फडणवीसांनाही काढायचायं सिनेमा! म्हणाले - माझ्या सिनेमात अनेकांचे मुखवटे फाटतील
मुंबई -मी जेव्हा सिनेमा काढेल तेव्हा अनेकांचे बुरखे फाटले जातील. अनेकांचे खरे चेहरे समोर येतील. योग्य वेळी मी सिनेमा काढेल असा मनोदय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबईत धर्मवीर आनंद दिघे - पार्ट 2 चित्रपटाचे ट्रेलर लाँच झाले. त्यावेळी फडणवीस बोलत होते.
राजकारणातही कलाकार आहेत
मुंबईत देवेंद्र फडणवीस म्हणाले, या सभागृहात स्क्रिनवरचे कलाकार आहेत, राजकारणातीलही कलाकार आहेत. या सर्वांचं स्वागत करतो. गुरुपोर्णिमेच्या पुर्वसंध्येला आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारीत धर्मवीर-२ चित्रपटाचे ट्रेलर आज प्रसारीत केले. हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही. ही जी टॅगलाईन केवळ या सिनेमापर्यंत मर्यादीत नाही तर आमच्या जीवनाची टॅगलाईनही हीच आहे की, हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही.

एकनाथ शिंदे असली सोने
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आनंद दिघेंच्या शिकवणीप्रमाणे आज एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राची धुरा सांभाळली त्यामुळे आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरे हे त्यांना आशीर्वाद देत असतील. या दोघांनाही विचारांशी गद्दारी मान्य नव्हती. विचारांशी गद्दारी झाली म्हणून ते सरकार सोडून बाहेर आले. दुर्दैवाने त्यांना गद्दार म्हणून हिनवले गेले, पण असली सोने काय हे महाराष्ट्राच्या जनेतने हेरले आणि त्यांचे नैतृत्व स्वीकारले.
🕖 7.10pm | 20-7-2024📍Worli, Mumbai | संध्या. ७.१० वा. | २०-७-२०२४📍वरळी, मुंबई.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 20, 2024
LIVE | धर्मवीर 2, मुक्काम पोस्ट ठाणे चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च@mieknathshinde @ZeeStudios_#Maharashtra #Dharmaveer2 https://t.co/9Qd4q0e0TS
आमचाही रोल असायला हवा
देवेंद्र फडणवीस म्हणाले, धर्मवीर -२ कुठपर्यंत गेला माहीत नाही पण त्यात आमचाही थोडासा रोल असायला हवा. कदाचित तो भाग तीनमध्ये येईल. खरं म्हणजे मलाही एक सिनेमा काढायचा आहे. मला सिनेमा जो काढायचा त्याला वेळ आहे. मी जेव्हा सिनेमा काढेल तेव्हा अनेकांचे बुरखे फाटले जातील. अनेकांचे खरे चेहरे समोर येतील. योग्य वेळी मी सिनेमा काढेल.
सिनेमा मला आतुरतेने बघायचा
देवेंद्र फडणवीस म्हणाले, धर्मवीर २ चे ट्रेलर आज प्रसारीत झाले. हा सिनेमा मला आतुरतेने बघायचा आहे. मला एकच इन्सिडन्ट सांगायचा आहे की, धर्मवीर हा केवळ महाराष्ट्रातच लोकांना आवडला असे नाही, तर गुजरातेतही आवडला. त्यामुळे ही सत्यकथा आहे. एक व्यक्ती सामान्यातून असामान्य कसा होतो हे आनंद दिघे यांच्या जीवनाकडे पाहून लक्षात येते. त्यामुळे चित्रपत निर्माते आणि दिग्दर्शकाचे अभिनंदन करतो.

माझं बुकींग आजच केलंय
देवेंद्र फडणवीस म्हणाले, धर्मवीर -२ नंतर आता धर्मवीर -३ ची तयारी सुरु करा असे दिग्दर्शकांना सांगत धर्मवीर-३,४,५ साठी मी माझे बुकींग आजच केले आहे, त्यामुळे तुम्हाला मला बोलवावेच लागेल असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
धर्मवीर -2 चे ट्रेलर लाँच
मुंबईत एका रंगारंग संमारंभात धर्मवीर आनंद दिघे - पार्ट 2 चित्रपटाचे ट्रेलर लाँच झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्कवेकर, दिग्दर्शक प्रविण तरटे, निर्माता मंगेश देसाई यांच्यासह राजकीय तसेच चित्रपट क्षेत्रातील दिग्गज मंडळींची उपस्थिती होती.












Click it and Unblock the Notifications