धक्कादायक! मालिकेच्या शूटिंगनंतर हॉटेलमध्ये झोपले उठलेच नाही, मराठी अभिनेते योगेश महाजन यांचा मृत्यू
Actor Yogesh Mahajan Passed Away : मराठी आणि हिंदी टीव्ही मालिकांमध्ये उत्तम भूमिका साकारणारे मराठी अभिनेते योगेश महाजन यांचा एका हाॅटेलमध्ये मृत्यू झाला आहे. योगेश महाजन यांनी 50 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुळचे जळगाव येथील योगेश महाजन यांनी 'मुंबईचे शहाणे', 'संसाराची माया' या मराठी चित्रपटांमध्ये काम केले होते.
हृदयविकाराचा झटक्याने निधन
मराठमोळे अभिनेते योगेश महाजन यांचा मृत्यू हृदयविकाराचा झटका आल्याने झाल्याची माहिती आता समोर आली आहे. शुटींग करुन ते हाॅटेलमधील खोलीत गेले होते, त्यानंतर पहाटे त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

उमरगावमध्ये सुरु होते शुटींग
योगेश महाजन हे 'शिव शक्ती-तप, त्याग, तांडव' या हिंदी मालिकेचं उमरगावमध्ये शूटिंग करत होते. या मालिकेत ते शुक्राचार्याचे पात्र साकारत होते. शनिवारी संध्याकाळी शूटिंग संपवल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटत होते. डॅाक्टरांकडे गेल्यानंतर त्यांनी औषधीही घेतली; नंतर हॅाटेलमधील त्यांच्या खोलीत झोपायला गेले होते.
हेही वाचा : चित्रपटसृष्टीतील चालतं बोलतं विद्यापीठ थांबले; फिल्म निर्माते श्याम बेनेगल यांचे निधन, वाचा कारकिर्द
रविवारी सेटवर आलेच नाही
योगेश महाजन हे हाॅटेलमधील खोलीतच होते पण रविवारी ते सेटवर आले नव्हते, त्यामुळे मालिकेच्या टीममधील लोकांनी त्यांना फोन केले, मात्र कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. महाजन यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने शुटींग टीममधील काही लोक ते थांबलेल्या हॅाटेलमध्ये गेले. दरवाजावर थाप मारुनही त्यांनी दरवाजा उघडला नाही.
हेही वाचा : अभिनेता सुदीप पांडेचे हार्ट अटॅकने निधन; हदयविकाराच्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा...
महाजन आत असताना ते दरवाजा उघडत नसल्याने खोलीचा दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी महाजन बेडवरून खाली पडलेल्या अवस्थेत होते. खोलीतच त्यांचे हृदविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यांच्या निधनाची बातमी समजल्यावर चाहते त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
योगेश महाजन यांच्या निधन हे कुटुंबासाठी, नातेवाईकांसाठी आणि मित्रांसाठी हा एक मोठा धक्का आहे. त्यांच्यावर आज 20 जानेवारी 2025 रोजी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
हेही वाचा : प्रितीश नंदी यांचे निधन, बॉलीवूडला धक्का! करीना कपूर ते अनुपम खेरपर्यंत यांनी वाहिली श्रद्धांजली












Click it and Unblock the Notifications