चित्रपटसृष्टीतील चालतं बोलतं विद्यापीठ थांबले; फिल्म निर्माते श्याम बेनेगल यांचे निधन, वाचा कारकिर्द
Shyam Benegal passes away : चित्रपट निर्माते आणि 8 वेळा राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी राहिलेले श्याम बेनेगल यांचे निधन सोमवारी सायंकाळी मुंबईत उपचारादरम्यान निधन झाले. मुंबईतील वोकॉर्ट रुग्णालयात सायंकाळी 6.38 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची कन्या पिया बेनेगल यांनी ही माहिती दिली.
काही दिवसांपासून होते आजारी
गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते, मूत्रपिंडाच्या आजाराने ते त्रस्त होते, त्यांच्या दोन्ही किडन्या फेल झाल्यामुळे त्यांना यापूर्वी देखील अनेकदा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. विशेष म्हणजे नुकतेच त्यांचा 90 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता, अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
फिल्मी जगतातील त्यांची कामगिरी
श्याम बेनेगल हे फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते, सह्याद्री फिल्म्स नावाच्या कंपनीचे ते मालक होते. त्यांनी द चर्निंग विथ विजय तेंडुलकर (1984), सत्यजित रे (1988), आणि द मार्केटप्लेस (1989) या त्यांच्या स्वतःच्या चित्रपटांवर आधारित तीन पुस्तके लिहिली आहेत. त्यांना 8 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, एक फिल्मफेअर पुरस्कार आणि नंदी पुरस्कारांसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.

भारत सरकारचा पद्मश्री देऊन सन्मानित
- सन 1976 मध्ये भारत सरकारने देशाचा चौथा-सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री देऊन सन्मानित केले होते.
- 1991 मध्ये, त्यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी देशातील तिसरा-सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण देऊन गौरविण्यात आले.
- 2005 मध्ये, श्याम यांना चित्रपट क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.
8 चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार, अनेक हीट चित्रपट
बेनेगल यांनी जुबैदा, द मेकिंग ऑफ द महात्मा, नेताजी सुभाष चंद्र बोसः द फॉरगोटन हीरो, मंडी, आरोहन, वेलकम टु सज्जनपुर यांसारखे अनेक दर्जेदार आणि लोकप्रिय चित्रपट बनवले.
25 फिल्म, 45 माहितीपट अन् दीड हजार....
त्यांच्या आर्ट चित्रपटांनी 8 राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. श्यान बेगेनल यांना सिनेसृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. श्याम बेनेगल यांनी करियरमध्ये 24 चित्रपट, 45 डॉक्यूमेंट्री आणि 1500 एड फिल्म्स बनवल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications