Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

प्रितीश नंदी यांचे निधन, बॉलीवूडला धक्का! करीना कपूर ते अनुपम खेरपर्यंत यांनी वाहिली श्रद्धांजली

Pritish Nandi passes away : प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि लेखक प्रितिश नंदी यांचे बुधवारी रोजी निधन झाले. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. मात्र, त्यांच्या मृत्यूच्या कारणाबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र या बातमीने बॉलिवूड जगाला धक्का बसला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक स्टार्स त्यांना श्रद्धांजली वाहिली. बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरनेही शोक व्यक्त केला आहे.

2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या प्रीतिशच्या 'चमेली' चित्रपटात त्याने काम केले होते. करीना कपूर हिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये ती प्रितिश नंदींसोबत शॉट्स दरम्यान गप्पा मारताना दिसत आहे.

Pritish Nandi passes away

चित्रपट निर्माते हंसल मेहतांनी वाहिली श्रद्धांजली

चित्रपट निर्माते हंसल मेहता यांनीही एक्सवर शोक व्यक्त केला. त्यांनी लिहिले: "दु:खद बातमी. माझ्या सर्वात वैयक्तिक कार्याने एक महान संरक्षक गमावला आहे. तुम्ही चांगले जीवन जगलात मिस्टर नंदी. तुमची खूप आठवण येईल. कुटुंबाप्रती मनापासून संवेदना."

अनिल कपूर यांच्याकडून श्रद्धांजली

अभिनेते अनिल कपूर यांनी प्रीतीश नंदी यांचे छायाचित्र शेअर केले आणि त्यांच्या प्रिय मित्राला त्यांनी श्रद्धांजली वाहताना लिहिले: "माझा प्रिय मित्र प्रितिश नंदी यांच्या निधनाने मला धक्का बसला आहे आणि मन हेलावले आहे. एक निर्भय संपादक, एक धाडसी व्यक्ती... असे त्यांचे वर्णन केले आहे. "

अनुपम खेर यांच्याकडून श्रद्धांजली

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी प्रितिश नंदी यांच्या निधनाबद्दल एक्स वर छायाचित्रे शेअर केली आणि लिहिले की, "माझ्या सर्वात प्रिय आणि सर्वात जवळच्या मित्रांपैकी एक असलेले प्रितेश नंदी यांच्या निधनाने खूप दुःख झाले! एक आश्चर्यकारक कवी, लेखक, चित्रपट निर्माता आणि एक धाडसी आणि अद्वितीय संपादक /पत्रकार ते होते. मुंबईत माझ्या सुरुवातीच्या काळात ते माझी सपोर्ट सिस्टीम आणि शक्तीचा स्रोत होते." त्यांनी पुढे लिहिले की, "आमच्यात बरेच साम्य होते. मला भेटलेल्या सर्वात निर्भय लोकांपैकी ते एक होते. ते मोठ्या मनाचे होते. मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो. HeartBroken."

हे आहेत प्रितीश नंदी यांचे खास चित्रपट

सध्या प्रीतीश नंदी यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. प्रितीश नंदी या ज्येष्ठ चित्रपट निर्मात्याने 'झंकार बीट्स', 'कांटे', 'हजारों ख्वाईशे ऐसी', 'प्यार के साइड इफेक्ट्स' आणि 'अग्ली और पगली' असे अनेक सुपरहिट चित्रपट बनवले आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+