सलमान खाननंतर राहुल गांधी लॉरेन्सचे पुढचे टारगेट; 'या' अभिनेत्याचा दावा; लॉरेन्स गँगचा उद्देश काय?
Lawrence Bishnoi Target to Salman Khan : एनसीपी नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर लॉरेन्स टोळीने त्यांच्या हत्याकांडाची जबाबदारी घेतली. तर सलमान आम्हाला हे करायचे नव्हते, पण तुला साथ देणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, असा संदेश लॉरेन्स टोळीने दिला. त्यानंतर अभिनेता सलमान खान याची आणखी सुरक्षा वाढवण्यात आली. तर सलमान खानच्या जीवावार लॉरेन्स बिश्नोई गॅंग उठलेली आहे. अशातच एका अभिनेत्याने आता नवा दावा केला आहे. सलमान खान याच्या पाठोपाठ आता राहुल गांधी देखील लॉरेन्स गॅंगच्या हिटलिस्टवर आहे, असा दावा त्यांनी केल्याने मनोरंजन क्षेत्रापाठोपाठ आता राजकीय क्षेत्रात देखील खळबळ उडाली आहे.
अभिनेत्याच्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाले?
मिळालेल्या माहितीनुसार, ओडिया चित्रपट अभिनेत्याने लॉरेन्स टोळीच्या निशाण्यावर सलमान खानच नाही तर भारतातील बड्या नेत्याचा देखील समावेश आहे. यात विरोधी पक्ष नेते तथा खासदार व कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नावाचा उल्लेख केला. ओडिया चित्रपटाच्या अभिनेत्याने असा दावा केल्याने व त्यांच्या विधानानंतर मात्र सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. तर उलटसुलट चर्चांना देखील सुरूवात झाली. हे विधान केले अभिनेता बुद्धादित्य मोहंती याने. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली.

अभिनेत्यावर गुन्हा दाखल, NSUI आक्रमक
अभिनेत्याने सोशल मीडियावर लिहिले की, 'जर्मनीकडे गेस्टापो होते... इस्रायलकडे मोसाद आहे... यूएसएकडे सीआयए आहे... आता भारताकडे लॉरेन्स बिश्नोई आहे... ओवेसी आणि राहुल गांधींची यादी आवश्यक आहे.' मोहंती यांची ही पोस्ट व्हायरल झाली आणि काँग्रेस पक्षाची विद्यार्थी शाखा असलेल्या नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने (NSUI) त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष उदित प्रधान यांनी शुक्रवारी राजधानी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि मोहंती यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर मोहंती यांनी ही पोस्ट डिलिट मारली आहे.
हे ही वाचा : Baba Siddique Marathi News: बाबा सिद्दीकींनी मिटवला होता सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यातील वाद!
आमच्या नेत्यावर असे विधान खपवून घेतले जाणार नाही
पीटीआयच्या वृत्तानुसार, प्रधान म्हणाले की, सोशल मिडिया पोस्टमध्ये मोहंती म्हणाले की राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे पुढील लक्ष्य काँग्रेसचे खासदार राहुल गांधी असावेत. आमच्या नेत्याविरोधात अशा प्रकारची टिप्पणी करणे आम्हाला सहन होणार नाही.नुकतेच लॉरेन्स बिश्नोईची हिट लिस्ट व्हायरल झाली होती, ज्यामध्ये सलमान खानचे नाव टॉपवर होते. बाबा सिद्दिकीच्या हत्येनंतर बिश्नोई टोळी चर्चेत आहे. दरम्यान, सलमान खानच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, भाईजानही बिग बॉसच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाला आहे. मात्र, अलीकडेच ओडिया अभिनेत्याच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा : बिग बॉस 18 च्या सेटवर सलमान खानला रडू का कोसळले? म्हणाला- मला येण्याची इच्छा नव्हती
सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी
दुसरीकडे, गेल्या वर्षभरापासून सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या धमक्या येत आहेत. काळवीट प्रकरणामुळे सलमान खान गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. सलमानसह त्याच्या कुटुंबियांनाही याआधी धमक्या देण्यात आल्या, त्याच्या घरावर गोळीबारही करण्याच आला. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि सलमान खानचे जवळचे मित्र बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमानला पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. यानंतर सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
हे ही वाचा : ...तर 24 तासांमध्ये तुझं नेटवर्क संपवून टाकेन; 'या' खासदारांनी दिले थेट लॉरेन्स बिश्नोईला चॅलेंज
सलमानने खरेदी केली नवीन बुलेट प्रूफ कार
सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याला आता Y+ सुरक्षा पुरवण्यात आली आहे. सलमान खानच्या शुटींगच्या सेटवर चोख बंदोबस्त करण्यात आलेला आहे. मोठ्या बंदोबस्तात सलमान खानचं बिग बॉस 18 आणि त्याच्या आगामी चित्रपटाचं शुटींग सुरु आहे. याशिवाय सलमानही सुरक्षेची काळजी घेत आहे. काही माध्यमांच्या अहवालानुसार, सलमान खानने बुलेटप्रूफ निसान पेट्रोल एसयूव्ही खरेदी केली आहे. ही कार भारतीय बाजारपेठेत उपलब्ध नाही, त्यामुळे सलमानने ती कार दुबईहून आयात केल्याची माहिती आहे. या SUV कारची किंमत सुमारे 2 कोटी रुपये आहे.












Click it and Unblock the Notifications