...तर 24 तासांमध्ये तुझं नेटवर्क संपवून टाकेन; 'या' खासदारांनी दिले थेट लॉरेन्स बिश्नोईला चॅलेंज
Baba Siddique Murder : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गुन्हेगारांनी गोळ्या झाडून हत्या केली. रविवारी सकाळी लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या सदस्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करून बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली.
याप्रकरणी पोलिसांनी रात्री उशीरापर्यंत तिघांना अटक केली आहे, तर तीन आरोपी अद्याप फरार आहेत. याप्रकरणावरुन आता बिहारमधील पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांनी सोशल मीडियावरुन गुंड लॉरेन्स बिश्नोई यांना खुले आव्हान दिले आहे. कायद्याने मला परवानगी दिली तर मी 24 तासांत लॉरेन्सची टोळी व त्याचे नेटवर्क संपवू शकतो. हा देश नपुंसक झाला आहे का, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

काय म्हणाले पप्पू यादव?
खासदार पप्पू यादव यांनी सोशल मीडियावर लिहिले की, हा देश आहे की षंढांची फौज, तुरुंगात बसलेला गुन्हेगार आव्हान देत आहे, लोकांना मारतोय, सगळेच केवळ प्रेक्षक बनले आहेत. कधी मूसेवाला, कधी करणी सेनेचा प्रमुख आणि आता उद्योगपती राजकारण्याची हत्या झाली. यासोबतच पप्पू यादव यांनी लॉरेन्स बिश्नोईला खुले आव्हान देत सांगितले की, कायद्याने परवानगी दिली तर लॉरेन्स बिश्नोईसारख्या वाईट गुन्हेगाराचे संपूर्ण नेटवर्क अवघ्या चोवीस तासांत उद्धवस्त करू शकतो.
यह देश है या हिजड़ों की फौज
— Pappu Yadav (@pappuyadavjapl) October 13, 2024
एक अपराधी जेल में बैठ चुनौती दे
लोगों को मार रहा है,सब मुकदर्शक बने हैं
कभी मूसेवाला,कभी करणी सेना के मुखिया
अब एक उद्योगपति राजनेता को मरवा डाला
कानून अनुमति दे तो 24घंटे में इस लारेंस बिश्नोई
जैसे दो टके के अपराधी के पूरे नेटवर्क को
खत्म कर दूंगा
महाराष्ट्रात जंगलराज
दरम्यान, पप्पू यादव या पोस्ट पूर्वी केलेल्या पोस्टमध्ये महाराष्ट्रावर देखील टीका केली. दुसऱ्या एका पोस्टमध्ये पप्पू यादव यांनी लिहिलं होतं की, महाराष्ट्रात भयंकर जंगलराज आहे, वाय संरक्षित सरकार समर्थित माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या हा त्याचा लाजिरवाणा पुरावा आहे! ते म्हणाले की, बिहारचे सुपुत्र बाबा सिद्दीकी यांची हत्या अत्यंत दु:खद आहे. भाजप आघाडी सरकार आपल्या पक्षाच्या अशा प्रभावशाली नेत्यांना संरक्षण देऊ शकत नसेल, तर सर्वसामान्यांचे काय होणार?, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्र में महाजंगलराज
— Pappu Yadav (@pappuyadavjapl) October 13, 2024
Y सिक्योरिटी सुरक्षा में सरकार समर्थक
पूर्व मंत्री बाबा सिद्दीकी जी की हत्या इसका
शर्मनाक प्रमाण!
बिहार के बेटे बाबा सिद्दीकी की हत्या अत्यंत
दुःखद है,BJP गठबंधन सरकार अपने दल के
इतने रसूख़ वाले नेताओं की रक्षा न कर पा रही है
तो अमलोगों का क्या होगा?












Click it and Unblock the Notifications