Baba Siddique Marathi News: बाबा सिद्दीकींनी मिटवला होता सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यातील वाद!
Baba Siddique Marathi News : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची रात्री उशिरा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दिकी हे राजकारणाशिवाय बाॅलीवूडशी संबंधित नाव होते. चित्रपटसृष्टीशी त्यांचे जुने नाते होते. सुपरस्टार सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यातील वाद बाबा सिद्दीकी यांनीच सोडवला होता, यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
मुंबईतील ईफ्तार पार्टी आणि बाबा सिद्दीकी हे नाते फार जुने आहे. अनेक दिग्गज त्यांच्या ईफ्तार पार्टीला हजेरी लावत असत. यात चित्रपट जगतातील दिग्गज कलाकारांचीही कमी नसायची. सलमान खान आणि शाहरुख खानही अनेकदा त्यांच्या पार्ट्यांमध्ये हजेरी लावायचे. या दोघांशी बाबा सिद्दीकी यांचे विशेष नाते होते.

2013 साली सोडवला होता वाद
बाॅलीवूडचे दोन सुपरस्टार शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यात स्टारडम् आणि इतर कारणांवरुन वाद असायचा त्यावेळी त्यांच्यातील वाद सोडवण्यासाठी बाबा सिद्दीकी यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. हा काळ 2013 चा होता. त्यानंतर सलमान खान आणि शाहरुख यांच्यात ठिणगी पडली नाही असे बोलले जाते एकाअर्थाने बाबा सिद्दीकी यांनी दोघांचा वाद सोडवण्यात खूप मोठी भूमिका बजावली होती.
जेव्हा झाले होते सलमान आणि शाहरुखचे भांडण?
दोन दिग्गज अभिनेत्यांनी जेव्हा अभिनेत्री कतरिना कैफच्या वाढदिवसानिमित्त हजेरी लावली होती तो काळ 2008 चा होता. वाढदिवसाच्या पार्टीत त्या रात्री सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यात वाद झाल्याचे तेव्हा बोलले जात होते. तिथे झालेल्या भांडणानंतर दोघेही एकमेकांना टाळताना दिसले आणि त्यांचे बोलणेही या काळात नव्हते.
सलमान शाहरुख यांच्यात पाच वर्ष अबोला?
पाच वर्ष अबोला असलेले सलमान आणि शाहरुख यांची मनं जुळवण्याचे काम बाबा सिद्दीकी यांनी केले त्यानंतर त्यांच्यात कधीही वाद उद्भवला नाही. सलमान खानला बाबा सिद्दीकींवरील हल्ल्याची बातमी समजताच त्याने रुग्णालयात धाव घेतली होती.












Click it and Unblock the Notifications