Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

इराण-इस्त्रायल युद्धामुळ मार्केट क्रॅश! शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स, निफ्टी 'एवढ्या' अंकांनी घसरला

Stock market crash today 2 march 2026 : जागतिक राजकारणातील तणावाचा थेट फटका आज भारतीय शेअर बाजाराला बसला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांच्या निधनानंतर आणि मध्य पूर्वेतील युद्ध भडकल्यानंतर सोमवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत असून, बाजारावर पूर्णपणे मंदीचे सावट आहे.

Stock market crash today 2 march 2026


बाजाराची स्थिती: एका नजरेत
  • सेंसेक्स: २७४३ अंकांच्या प्रचंड घसरणीसह ७८,५४३.७३ वर उघडला. (सध्या ९००+ अंकांनी खाली)
  • निफ्टी: २७४ अंकांनी घसरून २४,९०३.८५ च्या खाली व्यवहार करत आहे.
  • कच्चे तेल: ब्रेंट क्रूड ७ टक्क्यांनी वधारून ८२.४० डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे.

घसरणीची मुख्य कारणे काय?

१. खामेनेईंचा मृत्यू आणि युद्धाचा भडका

अमेरिकन आणि इस्रायली हल्ल्यात खामेनेई यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताने जागतिक अनिश्चितता वाढली आहे. त्यातच खोमनोईच्या मृत्यूमुळे युद्ध जास्त काळ चालेल ही शक्यता आहे, याचा फटका शअर बाजाराला बसला.

२. तेलाच्या किमतीत मोठी उसळी

इराणने होर्मुजची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) बंद करण्याची घोषणा केल्यामुळे तेलाचा पुरवठा विस्कळीत होण्याची भीती आहे. भारताचा ४०% कच्चा माल याच मार्गाने येतो.

३. गुंतवणूकदारांची माघार, सोन्यात गुंतवणूक

युद्धाच्या भीतीने गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून पैसा काढून सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोने आणि चांदीकडे वळवला आहे.

अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार?

कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने भारतातील महागाई वाढण्याची शक्यता आहे. तेल शुद्धीकरण कंपन्या आणि सरकार आता त्यांच्या स्टॉक लेव्हलचा आढावा घेत आहेत. जर हे युद्ध दीर्घकाळ चालले, तर शेअर बाजारातील ही घसरण अधिक तीव्र होऊ शकते.

(डिस्क्लेमर: शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या.)

हेही वाचा : सोन्याचा भाव 2 लाखांवर जाणार? इराण-इस्रायल युद्धामुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठी आग; पाहा ताजे दर

हेही वाचा : इराण-इस्रायल युद्धाचा भारताला मोठा फटका! पेट्रोल-डिझेलचे दर होऊ शकतात 'एवढे!' 'हे' आहे कारण वाचा

हेही वाचा : Trump vs Iran: 4 आठवड्यांत इराणचा खेळ खल्लास! कब्जा करण्याची तारीख फिक्स, ट्रम्पंचा 'खास' प्लॅन वाचा

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+