Trump vs Iran: 4 आठवड्यांत इराणचा खेळ खल्लास! कब्जा करण्याची तारीख फिक्स, ट्रम्पंचा 'खास' प्लॅन वाचा
Donald trump operation epic fury special plane : "जागतिक राजकारणातील सर्वात मोठा भूकंप झाला आहे! इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेने इराणला उद्ध्वस्त करण्याचा विडा उचलला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'ऑपरेशन एपिक फ्युरी'ची घोषणा करत इराणच्या लष्करी तळांना मातीमोल करण्याचा दावा केला आहे.
'एकतर शरण या, नाहीतर मरण्यासाठी तयार राहा', अशा शब्दांत ट्रम्प यांनी इराणला थेट इशारा दिला असून, पुढील चार आठवड्यांत इराणची सत्ता उलथवून टाकण्याचा महाविनाशक प्लॅन जगासमोर मांडला आहे. या कारवाईने तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडणार का? याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे."

काय आहे 'ऑपरेशन एपिक फ्युरी'?
डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, गेल्या ३६ तासांपासून सुरू असलेल्या या मोहिमेत अमेरिकेने इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे शेकडो तळ, एअर डिफेन्स सिस्टिम आणि नऊ युद्धनौका पूर्णपणे उद्ध्वस्त केल्या आहेत. ट्रम्प यांच्या मते, अण्वस्त्रधारी दहशतवादी सरकारला आता सहन केले जाणार नाही.
खामेनेईंचा मृत्यू आणि इराणमध्ये जल्लोष?
ट्रम्प यांनी एक खळबळजनक दावा केला आहे की, अयातुल्ला खामेनेई यांचा मृत्यू झाला असून ही बातमी समजताच इराणच्या रस्त्यांवर नागरिक आनंद साजरा करत आहेत. त्यांनी इराणच्या लष्कराला आणि पोलिसांना आवाहन केले आहे की, त्यांनी शस्त्रे खाली टाकावीत, अन्यथा त्यांचा खात्मा निश्चित आहे.
४ आठवड्यांत इराणचा खेळ खल्लास!
एका मुलाखतीत ट्रम्प यांनी संकेत दिले की, इराण हा मोठा देश असल्याने हे ऑपरेशन पूर्ण व्हायला किमान चार आठवडे लागू शकतात. मात्र, हे मिशन त्याआधीच संपवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या युद्धात काही अमेरिकन सैनिकांचा जीव जाऊ शकतो, हे मान्य करूनही ट्रम्प आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
इराणी जनतेला साद
"इराणी जनतेसाठी ही स्वातंत्र्याची सर्वात मोठी संधी आहे," असे म्हणत ट्रम्प यांनी तिथल्या नागरिकांना आपल्या सरकारविरुद्ध उभे राहण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेचे उद्दिष्ट केवळ सत्तापरिवर्तन करणे आणि जगावरचा अण्वस्त्रांचा धोका कायमचा संपवणे हेच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.












Click it and Unblock the Notifications