Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सोन्याने आता रंग बदलला; बाजारात आले 'हे' नवीन लाल सोने! मागणी वाढली...भाव किती जाणून घ्या

Red gold prices have increased : सोन्याने आता रंग बदलला आहे. होय तुम्हीही म्हणाल की, भाव आधी कमी होते आता गगनाला भीडले म्हणून दरामुळे सोन्याने रंग बदलला असेल पण तसे नाही...आता लाल रंगाचे सोने बाजारात आपली क्षमता दाखवत आहे. थोडेसे बिचकलात का? होय लाल रंगाचे सोने ज्याला आपण तांबे म्हणतो..त्याला डिमांड आली आहे.

तुम्ही म्हणाल की, तांब्याचा आणि सोन्याचा काय संबंध पण हा संबंध आहे, कारण सोन्याची जसे दागिने घडवले जातात अगदी तसेच दागिने तांब्याचेही घडवले जातात, आणि ते लोकप्रिय होत आहेत. वाढत्या सोन्याच्या दरांमुळे आता तांब्याला भाव आला आहे.

Red gold prices

तांब्याला आता म्हणू लागले नवे सोने!

जागतिक युद्धाचे परिणाम आणि ट्रम्प यांचे धोरण यामुळे गेल्या वर्षभरापासून सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, सोने एक लाख रुपये तोळा होऊन 96 हजारांवर स्थिरावले आहे , त्यामुळे आता सोन्याच्या दराने चांगलाच हादरा दिला आहे. अलिकडे तांब्याला भाव येत असून त्याला नवे सोने म्हटले जात आहे.

तांब्याला का आली मागणी?

जगात प्रदुषण वाढत चालले आणि या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी अर्थात डिकार्बनाईजेशनसाठी नवीन तंत्रज्ञान म्हणून तांब्याला मागणू येत आहे. तांबे वीज, क्लिन एनर्जी आणि डिजीटल युगात उपयोगी पडत आहे. त्यामुळे या धातूला अफाट मागणी आहे, अशातच गुंतवणूकदार सोन्यावरचे लक्ष हटवून तांब्यावर केंद्रीत करत आहेत.

तांब्याला किती आहे भाव?

सोने एकीकडे आर्थिक गुंतवणूक म्हणून उपयोगात आहे तर ते एक सुरक्षित गुंतवणुकीचे साधन आहे. तर तांबे ज्याला आपण काॅपर म्हणतो . 2022 मध्ये याच तांब्याचा व्यवहार 183 अब्ज डाॅलरवर पोहचला होता तर 2025 मध्ये कमालीची वाढ झाली असून 3 हजार 358 प्रति डाॅलर औंसच्या विक्रमावर पोहचला आहे.

तांब्याच्या दागिने सोन्याच्या तुलनेत स्वस्त

सोन्यासारखीच आता आता हवी तशी तांब्याची ज्वेलरी बाजारात उपलब्ध आहे ती सोन्यापेक्षा खूपच स्वस्त आहे. सोन्याच्या तुलनेत ती सर्वांना परवडणारी आहे आणि चोरी झाले तरीही फारसा फटका बसत नाही. यामुळे काॅपरच्या खरेदीकडे अनेकांचा कल वाढला आहे.

हेही वाचा : खूशखबर! सोन्याचे भाव 2 दिवसांत 4 हजारांनी घसरले, जाणून घ्या ताजे द, 'या' 3 कारणांनी रेट झाले कमी!

हेही वाचा : भाव खाणाऱ्या महागड्या सोन्याला करा बाय बाय! आता काॅपरचे दागिने स्वीकारा; समजून घ्या का वाढतेय डिमांड

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+