Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

खूशखबर! सोन्याचे भाव 2 दिवसांत 4 हजारांनी घसरले, जाणून घ्या ताजे द, 'या' 3 कारणांनी रेट झाले कमी!

Gold Price Today : गेल्या काही दिवसांपासून लाखाच्या घरात मिरवत असलेले सोन्याचे भाव काल-आज घसरले आहे. चार पाचशे रुपयांनी नव्हे तर एकदम 4 हजारांनी हे भाव कमी झाले. काल भाव जवळपास 4600 रुपयांनी घसरले, त्यानंतर आज सकाळी बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठ्या हालचाली सुरु झाल्या, विशेष म्हणजे दुपारी बारा वाजता नवीन भाव येतात, ते आले तेव्हा बाराशे रुपयांनी वधारले. एक लाखाच्या घरात गेलेले सोने जवळपास 96 हजारांवर आहे अर्थात खरेदीदारांचा चार हजार रुपयांनी फायदा होत आहे.

Gold Price Today

सोन्याचे भाव घसरण्यासाठी आतंरराष्ट्रीय घडामोड आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे धोरण कारणीभूत आहे चला जाणून घेऊया. आजचे ताजे भाव काय आहेत.

Take a Poll

आंतरराष्ट्रीय बाजारात स्वस्त झाले सोने?

इंडियन बुलियन एस एसोसिएशन (आईए) नुसार, 24 कॅरेट सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 94,970 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचे भाव 87,056 प्रति दहा ग्रॅम दर आहेत. आज चांदी 98 हजार 380 रुपये प्रति किलोने विकली जात होता. एबीपी लाईव्हच्या वृत्तानुसार, 24 एप्रिल रोजी सकाळी 7.55 वाजता गोल्ड मॅक्स 94,751 रुपये प्रति दहा ग्रॅम या दराने विकले जात होते.

भारतात किती आहे सोन्याचे भाव?

गोल्ड बुलियननुसार, भारतात आज 24 एप्रिल 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 96,200 रुपये इतका झाला आहे ही दुपारची आकडेवारी आहे. काल हा भाव 94 हजार 800 रुपये इतका होता. अर्थात आज बाराशे रुपयांनी सोने वाढले आहे. 22 कॅरेट सोन्याचे भाव 88,183 इतका सध्या आहे.

का घसरले सोन्याचे भाव? 3 पाँईंटमध्ये समजून घ्या..

1. सोन्याचे भाव घसरण्यासाठी डोनाल्ड ट्रम्पची जादूची कांडी आज कारणीभूत ठरली अर्थात डोनाल्ड ट्रम्प यांनी जे टॅरीफ धोरण राबवण्यास सुरुवात केली त्यामध्ये त्यांनी नरमाईची भूमिका घेतली.

2. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर भारी टॅरीफ लादला होता. त्यातून दोन्ही देशात आर्थिक तणाव वाढल्यानंतर सोन्याचे भावही वाढले अशातच डोनाल्ड ट्रम्प यांनी नरमाईची भूमिका घेतली आणि चीनवर लादलेला टॅरीफ कमी करण्याची घोषणा केली याचा परिणाम भाव कमी होण्यावर झाला आहे.

3. डोनाल्ड ट्रम्ह यांनी फेड रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पाॅवेल यांनी राजीनामा द्यावा ही भूमिका आता मागे घेतली आहे कारण यासंदर्भात त्यांनीच खुद्द राजीनामा देण्यासंदर्भातील भाष्य आता मागे घेतले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+