Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भाव खाणाऱ्या महागड्या सोन्याला करा बाय बाय! आता काॅपरचे दागिने स्वीकारा; समजून घ्या का वाढतेय डिमांड

Copper is the next gold : एकीकडे सोने जरा जास्तच 'भाव' खात आहे तर लाख रुपये तोळ्याकडे सोन्याची वाटचाल सुरु आहे, अशातच सामान्यांच्या आवाक्याबाहेर सोने पोहचले आहे. त्यामुळे गरीब आणि सामान्यांसाठी सोने खरेदी हे दिवास्वप्न ठरताना दिसत आहे. अशातच सोन्याच्या दागिन्यांना एक पर्याय समोर आला आहे.

काॅपरचे दागिने आणि काॅपर अर्थात तांबे...तांब्याला महत्व आता आले आहे. कधीकाळी तांब्याच्या भांड्याना महत्व होते पण स्टीलच्या क्रांतीनंतर तांबे आपले महत्व हरवून बसले पण तंत्रज्ञानाची जशी क्रांती होत आहे एआयचा वापर वाढला तेव्हा पुन्हा तांब्याचे दिवस आले आहे आणि आता तर सोने महागले असताना काॅपर धातूला मोठे महत्व आले आहे.

Copper jewellery

वेदांत समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये तांब्याला "नेक्स्ट गोल्ड" म्हटले आहे. इलेक्ट्रिक वाहने, अक्षय ऊर्जा, एआय आणि संरक्षण तंत्रज्ञानामध्ये या धातूचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचे त्यांनी सांगितले. अनिल अग्रवाल म्हणाले की, जगातील दुसऱ्या क्रमांकाची सोन्याची खाणकाम करणारी बॅरिक गोल्ड कंपनी आता आपल्या नावातून 'गोल्ड' हटवण्याच्या तयारीत आहे. कंपनीला आता स्वतःला "बॅरिक मायनिंग कॉर्पोरेशन" म्हणायचे आहे कारण ती तांबे खाणकामात वाढू लागली आहे.

तरुणांना संधी - अनिल अग्रवाल

अनिल अग्रवाल म्हणाले, जागतिक स्तरावर, तांब्याच्या खाणींचे पुनरुज्जीवन केले जात आहे, नवीन स्मेल्टर्स बांधले जात आहेत. भारतामध्ये गंभीर आणि संक्रमण धातूंमध्ये प्रचंड क्षमता आहे. तरुण उद्योजक आणि गुंतवणूकदारांसाठी उत्तम संधी. चला ते एक मिशन बनवूया.

का वाढतेय काॅपरची डिमांड?

काॅपर आणि काॅपरच्या दागिन्यांची डिमांड हल्ली वाढताना दिसत आहे. थोडक्यातच सांगायचे झाले तर काॅपर ज्वेलरी ही अगदी स्वस्त आहे. सोन्याच्या तुलनेत ती गरीब आणि सामान्यांना सहज हवी तेवढी खरेदी करता येते त्यातल्या त्यात काॅपरचे दागिने धनाढ्यांनाही लोभस वाटत आहेत. त्यांचाही खरेदीकडे कल असून काॅपरचे दागिने सोन्यासारखेच घडवले जात आहेत, बदलत्या तंत्रज्ञानामुळे काॅपल हवे तसे घडवले जात असल्याने दागिने मोहक आणि आकर्षक बनत असल्याचे कारागिर सांगतात.

आज 19 एप्रिल 2025 रोजी काय आहे सोन्याचे दर

सध्या देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 97 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे गेला आहे. आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 270 रुपयांनी वाढून दिल्लीत 97,730 रुपयांवर आहेत. जर आपण दागिन्यांच्या खरेदीदारांबद्दल बोललो तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. त्यातही 270 रुपयांची वाढ झाली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+