फोन खरेदी करताय? नवर्षाच्या पहिल्याच महिन्यात येताहेत 'हे' जबरदस्त स्मार्टफोन्स! होणार फायदाच फायदा

New Year 2025 January launch of amazing smartphones : नव्या वर्षात बहुतांशजणांचे नवे संकल्प तर असतातच पण नवीन वस्तूही खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो. नवीन वर्षात किंवा वर्षाच्या पहिल्याच दिवशी खासकरुन मोबाईल घेण्याकडे हल्ली कल वाढला आहे. त्यामुळेच आम्ही तुम्हाला सांगतो की, नवीन हँडसेट लॉन्च करण्याच्या बाबतीत 2025 हे वर्ष 2024 पेक्षा चांगले असणार आहे. कंपन्या अनेक नव्या सिरिज घेऊन येणार आहेत. चला तर आपल्या खिशाला परडवतील आणि चांगले फिचर्सही असतील अशा फोन्सच्या माहिती आपण जाणून घेऊया.

2024 मध्ये भरपूर स्मार्टफोन लाँच झाले. 2024 पूर्वी, 2023 किंवा 2022 मध्ये आलेल्या स्मार्टफोनच्या तुलनेत स्वस्त आणि अधिक वैशिष्ट्यपूर्ण हँडसेट 2025 मध्ये बाजारात येणार आहेत. आयफोन आणि सॅमसंग गॅलेक्सी सोडून जवळपास प्रत्येक स्मार्टफोन कंपनीने बजेट सेगमेंटमध्ये आपले हँडसेट लॉन्च केले आहेत.

New Year 2025 January launch of amazing smartphones

जानेवारीत होऊ शकतात काही मोबाईल्स लाँच

मोटोरोलाने डिसेंबरमध्ये Moto g05 आणि Moto g15 हँडसेट लॉन्च केले आहेत, जे 10 ते 15 हजार रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहेत. आता मोटोरोला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातही असे काही हँडसेट लॉन्च करू शकते. मात्र, याबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती आलेली नाही. पण वृत्तांनुसार मोटोरोला लवकरच आपल्या ग्राहकांना परवडेल असे फोन बाजारात घेऊन येऊ शकते.

Redmi 14C 5G 10 ते 15 हजारांच्या किमतीत लाँच होणार

Redmi 14C 5G देखील 10 ते 15 हजारांच्या दरम्यानच्या किमतीमध्ये लॉन्च होणार आहे. या फोनची किंमत सुमारे 11 हजार ते 12 हजार रुपये असू शकते. हा फोन 6 जानेवारीला लॉन्च होईल. फोनमध्ये 6.68-इंचाचा डिस्प्ले असू शकतो आणि त्यात Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. स्मार्टफोन ड्युअल 5G सिमचा असेल आणि 5,160mAh एवढी बॅटरीची क्षमता असेल.

हेही वाचा : नवीन वर्षासाठी 'जिओ'ने आणला ग्राहकांसाठी फाडू रिचार्ज प्लॅन, इतक्या रुपयांची होणार बचत

POCO X7 Neo ही देखील गाजलेली सिरीज आहे. या कंपनीचे कॅमेरे देखील चांगले असतात. या कंपनीचा फोन जानेवारीच्या मध्यात लाँच होण्याची दाट शक्यता आहे. मात्र याबाबत अद्यापही अधिकृत घोषणा झालेली नाही.

20 ते 30 हजाराच्या रेंजमध्ये दोन-तीन उत्तम स्मार्टफोन लाँच होणार

20 ते 30 हजाराच्या रेंजमध्ये दोन-तीन उत्तम स्मार्टफोन लाँच होतील . यापैकी एक आहे realme 14 pro. या फोनमध्ये तुम्हाला फ्लॅगशिप फोन्सची बहुतांश वैशिष्ट्ये पाहायला मिळतील. यात 6.7 इंच मायक्रो क्वाड वक्र अमोलेड स्क्रीन असणार आहे. हा फोन Snapdragon 7S Gen 3 ने सुसज्ज असेल. त्यात पेप्सिको कॅमेरा दिसेल. या फोनला IP69 रेटिंग मिळाले आहे. त्यामुळे हा फोन पाणी आणि धुळीपासून संरक्षित असेल.

या व्यतिरिक्त, या रेंजमध्ये POCO X7 मालिकेतील काही टॉप सेगमेंट हँडसेट लॉन्च केले जाऊ शकतात. यामध्ये 6550mAh ची मजबूत बॅटरी दिसेल. ड्युअल कॅमेरा सेटअपही दिसेल. हा फोनही जानेवारीच्या मध्यात लॉन्च होणार आहे.

हेही वाचा : BSNL देत आहे 107 रुपयांचा रिचार्ज प्लॅन! Airtel आणि Jio पेक्षा चांगला प्लॅन आहे का? त्वरित तपासा

Oneplus 13 आणि Oneplus 13R हे दोन फोन 30 ते 35 हजार बजेटच्या रेंजमध्ये लाँच होणार आहेत. हे फोन 7 जानेवारी 2025 ला बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. OnePlus 13 मध्ये Snapdragon 8 Elite प्रोसेसर असण्याची शक्यता आहे आणि 2K रिझोल्यूशनसह 6.8-इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले असू शकतो. यात 50MP Hasselblad ट्रिपल कॅमेरा असेल. OnePlus 13R मध्ये Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर असू शकतो. यात 1.5K रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह 6.78-इंचाचा AMOLED डिस्प्ले असू शकतो. 6,000mAh एवढी दमदार क्षमता असणारी बॅटरी या फोनमध्ये असेल.

हेही वाचा : जिओ ग्राहकांना नवीन वर्षाची भेट! फक्त 601 रुपयांत वर्षभर अनलिमिटेड 5G डेटा मिळणार! जाणून घ्या प्लॅन

याच रेंजमध्ये OPPO Reno13 5G सिरिज देखील भारतात लॉन्च केली जाईल. Reno13 5G सिरीजमध्ये OPPO Reno13 5G आणि OPPO Reno13 Pro 5G या फोनचा समावेश असेल. दोन्ही मॉडेल MediaTek Dimension 8350 चिपसेटवर चालतील. यात 1.5K रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह 6.83-इंच AMOLED डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. सीरिजमध्ये 50MP मुख्य कॅमेरा आणि 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,640mAh बॅटरी असू शकते.

हेही वाचा : मोबाईल ग्राहकांचा होणार मोठा फायदा! आता कॉल, SMS साठी वेगळे प्लॅन येणार; TRAI ने घेतला 'हा' निर्णय

75 हजाराच्या पुढे बजेट असणाऱ्यांसाठी 22 जानेवारी 2025 रोजी सॅमसंग आपली S25 सिरीज लाँच करेल अशी अपेक्षा आहे. Samsung Galaxy S25 सिरीजमध्ये Samsung Galaxy S25, Samsung S25 Plus, Samsung S25 Slim आणि Samsung S25 Ultra यांचा समावेश असेल. Galaxy S25 मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.2-इंचाचा AMOLED डिस्प्ले असण्याची शक्यता आहे.

Samsung S25 Plus आणि S25 Slim मध्ये 6.6-इंचाचा डिस्प्ले असण्याची अपेक्षा आहे. Samsung S25 Ultra मध्ये 200 मेगापिक्सल मुख्य कॅमेरा तर 50 मेगापिक्सल सेन्सर असण्याची अपेक्षा आहे. Samsung Galaxy S25 ची किंमत 75 हजार रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+