जिओ ग्राहकांना नवीन वर्षाची भेट! फक्त 601 रुपयांत वर्षभर अनलिमिटेड 5G डेटा मिळणार! जाणून घ्या प्लॅन
Jio 5G New Plan : Jio ने आपल्या ग्राहकांसाठी नवीन वर्षाची एक मोठी भेट दिली आहे. रिलायन्स जिओने अलीकडेच एक खास अनलिमिटेड 5G डेटा व्हाउचर जारी केला आह. यामध्ये ग्राहकांना एका वर्षासाठी अमर्यादित 5G डेटा मिळेल. या प्लॅननंतर आता दररोज 1.5 GB आणि 2 GB डेटा पॅक मोजून मापून वापरण्याची समस्या संपणार आहे.
कुणासाठी आहे हा प्लॅन?
हा प्लॅन अशा वापरकर्त्यांसाठी आहे जे आधीपासून Jio चा सक्रिय प्रीपेड प्लॅन चालवत आहेत. या व्हाउचरद्वारे 5G डेटाची सुविधा सहज मिळू शकते. ज्या वापरकर्त्यांना अमर्यादित 5G डेटा हवा आहे त्यांच्यासाठी रिलायन्स जिओचा नवीन अमर्यादित 5G डेटा प्लॅन एक उत्तम पर्याय असू शकतो. या योजनेची संपूर्ण माहिती आणि ती सक्रिय करण्याच्या पद्धती जाणून घेऊया.

अनलिमिटेड 5G व्हाउचरचे फायदे
- Jio चा हा नवीन व्हाउचर प्लॅन 601 रुपयांना उपलब्ध आहे आणि तो 12 महिन्यांसाठी अमर्यादित 5G डेटाचा लाभ देतो.
- हा व्हाउचर प्लॅन वापरण्यासाठी, तुमच्याकडे आधीपासूनच सक्रिय प्रीपेड योजना असणे आवश्यक आहे, ज्यामध्ये दररोज किमान 1.5GB डेटा उपलब्ध असेल.
- तुमच्याकडे दररोज 1GB डेटासह योजना असल्यास, हे व्हाउचर तुमच्यासाठी उपलब्ध नसेल.
- हे व्हाउचर Google Play Store आणि Apple App Store च्या MyJio ॲपद्वारे मिळू शकते.
हेही वाचा : मोबाईल ग्राहकांचा होणार मोठा फायदा! आता कॉल, SMS साठी वेगळे प्लॅन येणार; TRAI ने घेतला 'हा' निर्णय
हे व्हाउचर कसे सक्रिय करायचे
- हे व्हाउचर सक्रिय करण्यासाठी, सर्वप्रथम तुमच्याकडे सक्रिय प्रीपेड प्लॅन आहे ना याची खात्री करा.
- हे व्हाउचर ज्या प्लॅनमध्ये काम करेल त्यामध्ये रु. 199, रु 239, रु 299, रु 319, रु 329, रु 579, रु 666, रु 769, रु 899 सारख्या रिचार्जचा समावेश आहे.
- याव्यतिरिक्त, युजर्संना त्यांच्या मित्रांना आणि कुटुंबियांना हे व्हाउचर गिफ्ट करण्याचा पर्याय देखील मिळतो.
- दुसरीकडे रिलायन्स जिओ आपल्या नवीन 5G व्हाउचर प्लॅनसह युजर्संना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.
हेही वाचा : नवीन वर्षासाठी 'जिओ'ने आणला ग्राहकांसाठी फाडू रिचार्ज प्लॅन, इतक्या रुपयांची होणार बचत
Jio ला बसला मोठा धक्का
एकीकडे रिलायन्स जिओ आपल्या फाईव्ह जी व्हाऊचर प्लॅनसोबत युजर्स खेचण्याचा प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे जिओला एक धक्का बसला आहे. तो म्हणजे ट्रायच्या अहवालानुसार, जिओने ऑक्टोबर 2023 पर्यंत गेल्या 4 महिन्यांत 1.65 कोटी ग्राहक गमावले आहेत. त्याचबरोबर एअरटेल आणि व्होडाफोन आयडियालाही ग्राहकांचे नुकसान सहन करावे लागले आहे. या काळात बीएसएनएलने चांगली कामगिरी केली आणि आपल्या ग्राहकांची संख्या वाढवली आहे.












Click it and Unblock the Notifications