नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गुड न्यूज! एलपीजी सिलिंडर झाले स्वस्त! जाणून घ्या नवीन दर

lpg price today : एलपीजीची आजची किंमत: नवीन वर्ष 2025 च्या सुरुवातीमुळे सर्वसामान्यांना दिलासादायक बातमी मिळाली आहे. 1 जानेवारी 2025 पासून देशभरात 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरची किंमत कमी करण्यात आली आहे.

एकीकडे नवीन वर्षात दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसारख्या मोठ्या शहरांमध्ये व्यावसायिक सिलिंडरचे दर 14-16 रुपयांनी कमी झाले आहेत. मात्र, 14 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत 19 किलोचा एलपीजी सिलिंडर 14.50 रुपयांनी कमी, आता 1804 रुपयांना मिळणार आहे. पूर्वी तो 1818.50 रुपये होता.

Lpg price today


इतर शहरांमध्ये नवीन दर काय आहेत?

कोलकाता: पूर्वी 1927 रुपयांचा व्यावसायिक सिलिंडर आता 16 रुपयांनी कमी होऊन 1911 रुपयांना मिळणार आहे.

मुंबई: पूर्वी 1771 रुपये किमतीचा व्यावसायिक सिलिंडर आता 1756 रुपयांना म्हणजेच 15 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे.

चेन्नई: 1980.50 रुपयांचा व्यावसायिक सिलिंडर आता 1966 रुपयांना मिळणार आहे, म्हणजेच 14.50 रुपयांचा दिलासा.

हेही वाचा : LPG Cylinder: डिसेंबरच्या सुरुवातीला महागड्या गॅस सिलिंडरचा दणका, सलग पाचव्यांदा किंमती वाढल्या

घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती स्थिर

एकीकडे व्यावसायिक सिलिंडरचे दर कमी केले असतानाच घरगुती वापरासाठीच्या 14 किलो LPG सिलेंडरच्या किमती कमी होतील असा अंदाज होता. सामान्यांची तशी अपेक्षाही होती पण तसा काहीही बदल आज दिसून आला नाही अर्थात घरगुती वापराचे सिलिंडर आहे त्याच भावात मिळेल. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

हेही वाचा : लाडक्या बहिणींनो साध्या कागदावर अर्ज करा, तुमच्या नावे बदलून मिळेल गॅस कनेक्शन वर्षात 3 सिलिंडर मोफत

काय आहे घरगुती गॅस सिलिंडरचे दर

  • दिल्ली: 803 रुपये
  • कोलकाता: 829 रुपये
  • मुंबई: 802.50 रुपये
  • चेन्नई: 818.50 रुपये

1 डिसेंबर 2024 मध्ये सिलिंडर महाग झाले होते, त्यामुळे देशभरातील ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागला होता. मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीला मिळालेला हा दिलासा आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीतील कपातीचा थेट फायदा हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि इतर छोट्या व्यवसायांना होणार आहे. मात्र, स्थिर घरगुती सिलिंडरच्या किमतींमुळे सर्वसामान्य ग्राहकांना कोणताही नवा दिलासा मिळालेला नाही.

हेही वाचा : Bank Holidays In January 2025 : काम ताबडतोब पूर्ण करा, बँका जानेवारीमध्ये 15 दिवस बंद राहणार!

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+