Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

लाडक्या बहिणींनो साध्या कागदावर अर्ज करा, तुमच्या नावे बदलून मिळेल गॅस कनेक्शन वर्षात 3 सिलिंडर मोफत

Gas Connection Name Change Process for Ladki Bahin Yojana : माझी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील महिलांना वर्षातून तीन गॅस सिलिंडर मोफत दिले जात आहेत पण अनेक पुरुषांच्या नावावर गॅस सिलिंडर कनेक्शन आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना मोफत गॅस सिलिंडर योजनेचा लाभ घेता येत नाही. पण आज आपण पतीच्या नावावर असलेले गॅस सिलिंडर कनेक्शन पत्नीच्या नावे कसे करता येईल हे जाणून घेऊ.

या माहितीचा उपयोग करुन अनेक लाडक्या बहिणी त्यांच्या नावे गॅस कनेक्शन करुन घेऊ शकतील आणि त्यामुळे त्यांना वर्षाला मोफत तीन सिलिंडर मिळतील.

Gas Connection Name Change

गॅस कनेक्शन लाडक्या बहिणीच्या नावे करुन घेण्यासाठी काय करावे लागेल?

लाडक्या बहिणींना गॅस वितरक किंवा गॅस एजन्सीकडे जाऊन साध्या कागदावर अर्ज करुन आधारकार्ड जोडून दिल्यास त्यांना कनेक्शनवरील नाव बदलून मिळणार आहे. त्यामुळे त्यांना मोफत तीन गॅस सिलिंडरचा लाभ मिळू शकेल.

साध्या कागदावर करा अर्ज

लाडक्या बहिणींनो तुम्ही जर साध्या कागदावर जरी अर्ज करुन गॅस एजन्सी किंवा गॅस वितरकाकडे दिला तर तुमच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावाऐवजी तुमच्या नावावर गॅस कनेक्शन बदलून घेता येईल आणि तुम्ही अन्नपुर्णा योजनेतील मोफत गॅस सिलिंडरचा लाभ मिळवू शकाल. सुरुवातीला तुम्हाला या गॅस सिलिंडरसाठी पैसे द्यावे लागतील पण शासनाचे अनुदान तुमच्या खात्यावर जमा होणार आहे.

काय आहे मोफत सिलिंडरची योजना

महायुती सरकारने विधानसभेत 28 जूनमध्ये अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. महायुती सरकारच्या या कार्यकाळातील हा अखेरचा अर्थसंकल्प होता. या अर्थसंकल्पामध्ये सरकारकडून अनेक लोकप्रिय योजनांबाबत घोषणा करण्यात आली. या अर्थसंकल्पामध्ये केलेल्या काही घोषणांमध्ये एक घोषणा म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. या योजनेने अनेक गरीब, होतकरु आणि हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांना आधार दिला, यासह समाजातील सर्वच जनसामान्यांना मोठा आधार या योजनेने मिळाला.

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; आजपासून मिळणार डिसेंबरचा हप्ता, नक्की खातं चेक करा!

अन्नपुर्णा योजनेचा उद्देश

देशातील स्त्रियांना धुरमुक्त वातावरणात जगता यावे, देशातील गरीब कुटूंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरविणे, तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करुन स्त्री सक्षमीकरण करणे, या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन-2016 मध्ये सुरु करण्यात आली. सदर योजनेंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅसजोडणी देण्याचे काम तेल कंपन्यांच्या सहकार्याने सुरु आहे.

महायुती सरकारची न भुतो न भविष्यती मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना! मिळतात वर्षाला मोफत 3 गॅस सिलिंडर

महाराष्ट्रात सद्यः स्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गॅसजोडणी घेतलेले तसेच, सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅसजोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस जोडण्यांचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही. तसेच, एक सिलिंडर संपल्यानंतर दुसरे सिलिंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकाकरिता साधन उपलब्ध नसल्यामुळे, परिणामी ते वृक्षतोडीला आळा घालून पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना आणली आहे.

अन्नपुर्णा योजनेचा 52 लाख 16 हजार 412 कुटुंबांना लाभ

मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेचा लाभ 52 लाख 16 हजार 412 कुटुंबांना लाभ कुटुंबांना लाभ देण्यावर सरकारने जोर दिला आहे. अतिरिक्त अर्थसंकल्पात यासंदर्भात भूमिका महायुती सरकारने या योजनेचा उद्देशही सांगितला आहे तसेच ही योजना पर्यावर संरक्षणासाठी सहाय्यभूत ठरणार आहे . या योजनेंतर्गत राज्य सरकारच्या वतीने राज्यातील सुमारे 52 लाखांहून अधिक कुटुंबांना दरवर्षी तीन-तीन गॅस सिलिंडर मोफत उलब्ध करून देणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+