लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; आजपासून मिळणार डिसेंबरचा हप्ता, नक्की खातं चेक करा!

मुख्यंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलं होतं. आता राज्यातील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे. आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता पडण्यास प्रारंभ होणार आहे.

1500 रुपये प्रति महिनाच रक्कम मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे विधानसभेत अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाईल, असं म्हटलं होतं. दरम्यान, लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्याची प्रक्रिया आज दि.24 पासून सुरू करण्यात आली आहे. तर 2100 रुपये नव्हे तर 1500 रुपयांचाच सहावा हप्ता मिळणार आहे.

डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3500 कोटींची तरतूद

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पाच हप्त्यांची रक्कम पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. जुलै ते नोव्हेंबर पर्यंत 1500 रुपयांप्रमाणं 7,500 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. निवडणुकीपूर्वीच महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आलेला होता. आता डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम आजपासून महिलांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे.

Majhi Ladki bahin yojna

किती महिलांना मिळणार लाभ?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता दोन टप्प्यात दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 2 कोटी 35 लाख महिलांना पंधराशे रुपये प्रमाणे डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे.

विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी अखेरच्या टप्प्यात महिला व बाल कल्याण विभागाकडे 25 लाख महिलांचे अर्ज आले होते. त्या अर्जांची छाननी राहिली असल्यानं ती पूर्ण करुन या महिलांना देखील डिसेंबरचा हप्ता दुसऱ्या टप्प्यात दिला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केल्यानंतर महायुतीनं मोठी घोषणा केली होती. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात महायुतीकडून लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, डिसेंबरचा हप्ता 1500 रुपयांप्रमाणं मिळणार आहे. त्यामुळे 2100 रुपयाप्रमाणे हप्ता कसा मिळेल, याकडे सर्व महिलांचे लक्ष लागून आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+