Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

LPG Cylinder: डिसेंबरच्या सुरुवातीला महागड्या गॅस सिलिंडरचा दणका, सलग पाचव्यांदा किंमती वाढल्या

LPG Cylinder Price: आजपासून डिसेंबर महिनाला सुरूवात झाली आहे. अशा स्थितीत डिसेंबर महिना सुरू होताच जनतेला महागड्या गॅस सिलिंडरचा दणका बसला आहे. आज तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे.

सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किंमतींचा आढावा घेतात. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. चांगली गोष्ट म्हणजे घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

LPG Price Hike

घरगुती सिलिंडरचे दर स्थिर

तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ केली आहे. तर 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून त्याचे दर स्थिर आहेत.

भावात 16.50 रुपयांची वाढ

व्यावसायिक गॅस सिलिंडरबद्दल बोलायचे झाले तर 19 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत 16.50 रुपयांनी वाढली आहे. किंमती वाढल्यानंतर दिल्लीत त्याची किंमत 1818.50 रुपये झाली आहे. गेल्या महिन्यात त्याची किंमत 62 रुपयांनी वाढली होती. ऑक्टोबर महिन्यात हा सिलिंडर 1740 रुपयांना मिळत होता.

तेल कंपन्यांनी सलग पाचव्यांदा व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ केली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्यामुळे खाद्यपदार्थांच्या किंमती वाढू शकतात. व्यावसायिक सिलेंडरची किंमत आता कोलकात्यात 1927 रुपये, मुंबईत 1771 रुपये आणि चेन्नईमध्ये 1980 रुपये झाली आहे.

वेगवेगळ्या शहरांमध्ये किंमती

घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर दिल्लीत 14.2 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 803 रुपये आहे. तर कोलकात्यात 829 रुपये, मुंबईत 802.50 रुपये, चेन्नईत 818.50 रुपये आहे. उज्ज्वला सिलेंडरवर लोकांना 300 रुपये सबसिडी मिळते. मात्र ही सबसिडी एका वर्षात केवळ 12 सिलिंडरवरच मिळते. ऑगस्ट महिन्यापासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+