EPS Pension Hike : EPFO लाभधारकांसाठी गुड न्यूज, किमान पेन्शनमध्ये होणार वाढ, मिळणार इतके रुपये
EPS Pension Hike : EPFO सदस्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. त्याचे कारण म्हणजे, ईपीएफओच्या वतीने मोठा निर्णय घेण्यात आला आहे. किमान पेन्शनमध्ये वाढ करण्यासंदर्भात हा निर्णय असणार आहे. दरम्यान, ती कधीपासून होईल, याबाबत अद्याप स्पष्टीकरण आलेले नाही, परंतु, त्यादृष्टीने पाऊले उचलली जात असल्याचे समोर आले आहे.
काही माध्यमांच्या अहवालानुसार, संसदीय समितीने खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी किमान पेन्शन 1 हजारांवरुन 7,500 रुपये करण्याची मागणी केली आहे.
2014 मध्ये, केंद्र सरकारने ईपीएफओ सदस्यांना देण्यात येणारी किमान पेन्शन 250 रुपयांवरून 1000 रुपये प्रति महिना वाढवली होती. आता पुन्हा यात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

11 वर्षांपासून सुरू आहे मागणी
कामगार संघटना आणि पेन्शनधारक संघटना गेल्या काही काळापासून किमान पेन्शन दरमहा किमान 7,500 रुपये करण्याची मागणी करत आहेत. महागाई खूप वाढली आहे, त्यामुळे पेन्शन देखील वाढली पाहिजे. गेल्या 11 वर्षांत त्यात कोणताही बदल झालेला नाही, यासंदर्भात सातत्याने मागणी होत आहे. त्यामुळे केंद्र सरकार या दृष्टीने पाऊले उचलण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
हे ही वाचा : EPFO बाबत मोठी अपडेट, आता ATM वरुन काढता येणार पैसे; कधी, कसे काढायचे पैसे? वाचा डिटेल्स
महागाईत प्रचंड वाढ झालीय
काही माध्यमांच्या अहवालानुसार,कामगार विषयक संसदीय स्थायी समितीने केंद्र सरकारला ईपीएफओच्या कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत (EPS) देण्यात येणाऱ्या किमान पेन्शनमध्ये वाढ करण्याची विनंती केली आहे. सध्या हे पेन्शन दरमहा 1 हजार रुपये आहे.
यावर समितीने म्हटले आहे की, 2014 च्या तुलनेत 2025 मध्ये महागाई अनेक पटींनी वाढली आहे आणि त्यानुसार पेन्शन वाढवण्याची गरज आहे.
समितीने पुढे म्हटले आहे की, आर्थिक परिणाम लक्षात घेऊन, सरकारने पेन्शनधारक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना लक्षात घेऊन याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
हे ही वाचा : ईपीएफ खातेधारकांनो हे महत्त्वाचे अपडेट चेक करा! नाहीतर बसू शकतो फटका! काय आहे कारण जाणून घ्या
पेन्शनमध्ये किती पैसे कापले जातात?
कामगार संघटनांच्या मागणीनंतर समितीने सांगितले की, योजना सुरू झाल्यानंतर 30 वर्षांनी तिचे तृतीय पक्ष मूल्यांकन केले जात आहे. समितीने म्हटले आहे की ही प्रक्रिया 2025 साली संपण्यापूर्वी निर्धारित वेळेत पूर्ण करावी.
खाजगी नोकरी करणाऱ्या लोकांसाठी, ईपीएफ खात्यासाठी त्यांच्या मूळ पगारावर 12% कपात केली जाते. यासोबतच, कंपनी कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात एवढे पैसे जमा करते आणि नियोक्त्याने जमा केलेल्या पैशांपैकी 8.33 टक्के रक्कम ईपीएसमध्ये जाते, तर उर्वरित 3.67 टक्के रक्कम ईपीएफमध्ये जाते.
हे ही वाचा : सुमारे 6 कोटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; EPFO ची मोठी घोषणा, EDLI योजना म्हणजे काय?












Click it and Unblock the Notifications