मोठी बातमी! PFच्या पैशांबाबत दिवाळीपूर्वीच खुशखबर येणार? या दिवशी EPFOची बैठक, धडाकेबाज निर्णय होणार
EPFO 3.0 : EPFO 3.0 : केंद्रीय भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात इपीएफओ आपल्या सदस्यांसाठी एक मोठी भेट देणार आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत येत्या काही दिवसांत इपीएफओची मोठी बैठक होणार आहे. या बैठकीत पीएफच्या पैशांसंदर्भात मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. खास करुन पीएफचे पैसे काढणे कसे सहज होईल याबद्दल धडाकेबाज निर्णयाची शक्यता आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सदस्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. गुड रिटर्ननुसार, ईपीएफओ ३.० (EPFO 3.0) लवकरच सुरू होणार असून, यात अनेक महत्त्वाचे बदल अपेक्षित आहेत. या बदलांमध्ये ए.टी.एम. (ATM) आणि युपीआयच्या (UPI) माध्यमातून पीएफ (PF) चे पैसे काढण्याची सुविधा मिळण्याची शक्यता आहे.

दिवाळीपूर्वी महत्त्वाचा निर्णय
केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली १०-११ ऑक्टोबर रोजी ईपीएफओच्या केंद्रीय न्यासी मंडळाची (CBT) एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत ईपीएफओ ३.० आणि त्यातील नवीन सुविधांवर चर्चा केली जाईल. या निर्णयामुळे दिवाळीपूर्वी पीएफ धारकांना मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे.
एटीएममधून पैसे कसे काढणार?
- नवीन प्रणालीनुसार, ईपीएफओ आपल्या सदस्यांना एक खास एटीएम कार्ड देण्याची शक्यता आहे.
- हे कार्ड थेट त्यांच्या पीएफ खात्याशी जोडले जाईल.
- ज्यामुळे सदस्य कोणत्याही एटीएम मशीनमधून आपले पीएफचे पैसे काढू शकतील.
- याशिवाय, युपीआयद्वारे पैसे काढण्यासाठी पीएफ खाते युपीआयशी लिंक करावे लागेल.
- ज्यामुळे पैसे थेट बँक खात्यात ट्रान्सफर करता येतील.
नवीन सुविधांचा 'हा' फायदा
ईपीएफओ ३.० सुरू झाल्यावर पीएफमधून पैसे काढणे, माहिती अपडेट करणे आणि दावा दाखल करण्याची प्रक्रिया खूप सोपी होईल. ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आणि वेगवान असेल. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आपले युएएन (UAN) क्रमांक सक्रिय ठेवावा आणि आधार कार्ड खात्याशी लिंक करावे.
पेन्शन वाढीलाही मिळू शकते मंजुरी
या बैठकीत पीएफ पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी मिळण्याचीही शक्यता आहे. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली किमान पेन्शन १,००० रुपयांवरून १,५०० ते २,५०० रुपये पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव विचारात घेतला जाऊ शकतो. जर हा प्रस्ताव मंजूर झाला, तर पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळेल.
हेही वाचा : How to withdraw EPF : 'पीएफ' काढण्याच्या प्रक्रीयेत होऊ शकतो बदल! या स्टेप्स फाॅलो करा अन् EPF काढा
हेही वाचा : GST Reform जीएसटी बदलानंतर स्वस्त वस्तूंचीच चर्चा; पण हा फटका! कोणत्या गोष्टी महाग होणार? जाणून घ्या












Click it and Unblock the Notifications