Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

GST Reform जीएसटी बदलानंतर स्वस्त वस्तूंचीच चर्चा; पण हा फटका! कोणत्या गोष्टी महाग होणार? जाणून घ्या

GST Reform : केंद्र सरकारने जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) व्यवस्थेत सर्वात मोठा बदल केला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केले आहे की, २२ सप्टेंबर, २०२५ पासून नवीन 'जीएसटी २.०' प्रणाली लागू होईल, ज्यात फक्त दोन मुख्य स्तरावर (स्लॅब) कर असेल - ५% आणि १८%. यासह, चैनीच्या आणि हानिकारक वस्तूंसाठी (Sin Goods) एक विशेष ४०% चा कर स्लॅब तयार करण्यात आला आहे. आता १२% आणि २८% चे स्लॅब रद्द करण्यात आले आहेत.

या बैठकीअंतर्गत आता बऱ्याच वस्तू रास्त दरात उपलब्ध होणार आहेत पण काही वस्तू महागणार आहेत, स्वस्त वस्तूंचीच चर्चा जास्त होत असतानाच वाचकांनी कोणत्या वस्तू महाग होणार आहेत, त्या परवडणाऱ्या असतील का हेही तपासून पाहायला हवे, त्यासाठीच खाली डिटेल्स देत आहोत.

GST Reform

'सिन टॅक्स' काय असतो?

'सिन टॅक्स' (Sin Tax) हा एक विशेष प्रकारचा कर आहे, जो अशा वस्तू आणि सेवांवर लावला जातो ज्या समाजासाठी आणि आरोग्यासाठी हानिकारक मानल्या जातात. यात सहसा दारू, तंबाखू, सिगारेट, साखरयुक्त पेये (Sugar-added drinks) आणि जुगार यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो. या कराचा उद्देश केवळ सरकारसाठी महसूल मिळवणे हा नसून, लोकांना या व्यसनांपासून दूर ठेवणे आणि त्यांच्या अतिसेवनाला प्रोत्साहन न देणे हा देखील आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, 'सिन टॅक्स' हा एक प्रकारचा 'निराशाजनक कर' आहे, ज्याद्वारे लोकांच्या जीवनशैलीवर नियंत्रण ठेवण्याचा आणि समाजावरील नकारात्मक परिणाम कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.

४०% 'सिन टॅक्स' स्लॅबमध्ये कोणत्या वस्तू आहेत?

जीएसटी कौन्सिलने काही हानिकारक वस्तूंवर उच्च दर लावण्याचा निर्णय घेतला आहे. ४०% च्या विशेष स्लॅबमध्ये खालील वस्तूंचा समावेश असेल.

  • सुपर लक्झरी वस्तू
  • पान मसाला, सिगारेट, गुटखा, चघळण्याचा तंबाखू, जर्दा
  • साखर मिसळलेली पेये, सर्व प्रकारचे एरेटेड वॉटर (aerated water), कार्बोनेटेड आणि कॅफिनेटेड ड्रिंक्स, तसेच अल्कोहोल नसलेली पेये
  • ३५० सीसीपेक्षा जास्त इंजिन असलेल्या मोटरसायकल
  • हेलिकॉप्टर, यॉट्स आणि वैयक्तिक वापरासाठी विमाने
  • लक्झरी कार
  • फास्ट फूड

या वस्तूंवर २८ टक्के जीएसटी लागू राहील!

सध्या, पान मसाला, सिगारेट, गुटखा, बिडी आणि तंबाखू उत्पादनांवर जुना २८% जीएसटी दर लागू राहील, कारण सरकारी भरपाई आणि कर्ज अजून बाकी आहे. हे सर्व स्पष्ट झाल्यानंतर या वस्तूंनाही ४०% च्या स्लॅबमध्ये समाविष्ट केले जाईल.

आयपीएलचा आनंद घेणे महागणार!

यासोबतच स्टेडियममध्ये इंडियन प्रीमियर लीग (IPL) सामन्यांचा आनंद घेणेही आता अधिक महाग होणार आहे. लक्झरी क्रिकेट स्पर्धा आणि अशाच इतर खेळांच्या तिकिटांवरील जीएसटी दर २८% वरून ४०% करण्यात आला आहे. याचा परिणाम म्हणून आयपीएल तिकिटे, कॅसिनो आणि रेस क्लब महाग होतील.

४० टक्के जीएसटीवर उपकार लागू राहणार नाही

जीएसटी कौन्सिलने हे स्पष्ट केले आहे की, ज्या वस्तूंवर ४०% जीएसटी निश्चित केला जाईल, त्यावर कोणताही अतिरिक्त उपकर (सेस) किंवा सबटॅक्स वसूल केला जाणार नाही. मात्र, या वस्तूंवर ४०% जीएसटी कधीपासून लागू होईल, याची तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+