Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

How to withdraw EPF : 'पीएफ' काढण्याच्या प्रक्रीयेत होऊ शकतो बदल! या स्टेप्स फाॅलो करा अन् EPF काढा

How to withdraw pf In marathi : नोकरदारांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने अर्थात पीएफ विभागात आता एक मोठा बदल होण्याची शक्यता आहे. आता नोकरदारांना कर्मचाऱ्यांच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्यातून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल होऊ शकतो. तुम्हाला नोकरी सोडण्याची किंवा निवृत्तीची वाट पाहावी लागणार नाही कारण पीएफ काढण्याचे कडक नियम आता शिथिल होऊ शकतात आणि त्यामुळे तुम्हाला तुमचा पीएफ काढताना अडचणी येणार नाही अशी शक्यता आहे.

केंद्र सरकार निवृत्ती निधीतून पैसे काढण्याच्या कडक नियमांमध्ये शिथिलता आणण्याचा विचार करत आहे. मनीकंट्रोलच्या मते, यामुळे ग्राहकांना दर १० वर्षांनी एकदा संपूर्ण रक्कम किंवा त्याचा काही भाग काढता येऊ शकतो अशी शक्यता आहे. सध्याच्या नियमानुसार, निवृत्तीनंतरच पीएफची संपूर्ण रक्कम काढता येते, त्यातही साधारणपणे ५८ वर्षांच्या वयात किंवा तुम्ही दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ बेरोजगार असल्यास पैसे काढता येतात.

How to withdraw pf In marathi

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत PF खात्यातून गरजेनुसार पैसे कसे काढायचे याबद्दल अनेक कर्मचारी वर्गाला माहिती नसते.अनेकजण पीएफ खात्यातील पैसे काढण्यासाठी थर्ड पार्टीची मदत घेतात, पण आता ती मदत घेण्याऐवजी तुम्ही घरबसल्या तुमचा पीएफ काढू शकाल. त्यासाठी काही स्टेप्स फाॅलो कराव्या लागतील. आपण पीएफ खात्यातून पैसे कसे काढावे हे समजून घेऊया.

EPF पैसे काढण्यासाठी या 10 टीप्स फॉलो करा (How to withdraw pf In marathi)

1. सर्वप्रथम EPFO ​​च्या ई-सेवा पोर्टलवर जा

2. यानंतर तुम्हाला तुमचा UAN (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) आणि पासवर्डसह EPFO ​​सदस्य पोर्टलवर लॉग इन करावे लागेल.

3. आता तुम्हाला पोर्टलवर विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल जसे तुमचे नाव, जन्मतारीख, पॅन, आधार क्रमांक आणि इतर.

4. त्यानंतर तुम्हाला ऑनलाइन दाव्यासाठी 'प्रोसीड' वर क्लिक करावे लागेल.

5. आता तुम्हाला ड्रॉप-डाउन मेनूमध्ये दिलेला पीएफ ॲडव्हान्स (फॉर्म 31) निवडावा लागेल.

6. येथे तुम्हाला आगाऊ रकमेवर दावा करण्याचे कारण द्यावे लागेल जे आजारपण, शिक्षण किंवा घर खरेदी असू शकते.

7. आता तुम्हाला तुमची इच्छित रक्कम टाकावी लागेल आणि तुमचा वर्तमान पत्ता द्यावा लागेल.

8. त्यानंतर तुम्हाला 'Disclosure Form' वर स्वाक्षरी करावी लागेल.

9. पुढे तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर OTP प्राप्त करण्यासाठी आधार OTP वर क्लिक करावे लागेल.

10. पासवर्ड टाकल्यानंतर, तुम्हाला क्लेम फॉर्म सबमिट करण्यापूर्वी 'Validate OTP' वर क्लिक करावे लागेल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+