Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीला 300 वर्षांनंतर दुर्मिळ 'त्रिग्रही योग'! या ३ राशींचे नशीब चमकणार

Mahashivratri 2026 Rare Trigrahi Yoga : भक्ती आणि शक्तीचा संगम असलेल्या महाशिवरात्रीला यंदा विशेष ज्योतिषशास्त्रीय महत्त्व प्राप्त झाले आहे. ज्योतिषतज्ज्ञांच्या मते तब्बल ३०० वर्षांनंतर यंदा महाशिवरात्रीला 'त्रिग्रही योग' जुळून येत असून, यामुळे ग्रहमालेत मोठी उलथापालथ होणार आहे. या योगाचा प्रभाव सर्व राशींवर पडणार असला तरी, तीन नशीबवान राशींसाठी हा काळ 'गोल्डन टाईम' ठरणार आहे.

Mahashivratri 2026 Rare Trigrahi Yoga

काय आहे त्रिग्रही योग?

जेव्हा एकाच राशीत किंवा भावात तीन ग्रह एकत्र येतात, तेव्हा त्याला त्रिग्रही योग म्हणतात. यंदा सूर्य, बुध आणि शनी या तीन बलाढ्य ग्रहांची युती होत आहे. सूर्य आत्मविश्वास, बुध बुद्धी आणि शनी कर्माचे प्रतीक मानले जातात. या तिन्हींच्या संगमामुळे करिअर आणि आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल घडतील.

या ३ राशींची होणार चांदी..

मेष :

करिअरमध्ये मोठी संधी मिळेल. मेहनतीचे योग्य फळ मिळेल, मात्र रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. प्रेमसंबंधांसाठी हा काळ अनुकूल राहील.

वृषभ :

धनलाभाचे प्रबळ योग आहेत. अडकलेले पैसे परत मिळतील. कुटुंबात सुख-शांती नांदेल, परंतु प्रकृतीची काळजी घ्यावी.

कन्या :

कामात स्थिरता येईल. स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे. नात्यातील दुरावा कमी होईल, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवावे.

महाशिवरात्रीला करा 'हे' उपाय:

संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी उपवास करावा. शिवलिंगावर जल, दूध आणि बेलपत्र अर्पण करून 'ॐ नमः शिवाय' किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. गरजू लोकांना दान केल्यास जीवनातील सर्व कष्ट दूर होऊन सुख-समृद्धी लाभेल.

(Disclaimer): ही माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या मान्यता आणि माहितीवर आधारित आहे. आम्ही या माहितीची अधिकृत पुष्टी करत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञ ज्योतिषी किंवा पंडितांचा सल्ला आवर्जून घ्यावा.

हेही वाचा : Maha shivratri 2026 Wishes in Marathi महाशिवरात्रीसाठी खास शुभेच्छा संदेश, व्हॉट्सॲप स्टेटस

हेही वाचा : यंदाची महाशिवरात्र ज्योतिषाच्या दृष्टीने ठरणार 'पॉवरफुल'; या 7 राशींचे भाग्य फळफळणार! 3 ग्रहांची...

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+