Maha shivratri 2026 Wishes in Marathi महाशिवरात्रीसाठी खास शुभेच्छा संदेश, व्हॉट्सॲप स्टेटस
Mahashivratri 2026 Wishes in Marathi : देवोंचे देव महादेव यांच्या उपासनेचा सर्वात मोठा सण म्हणजेच 'महाशिवरात्री' देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होते. येत्या १५ फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे, या दिवशी देशातील कोट्यवधी भाविक उपवास धरतात आणि शिवभक्त पहाटेपासूनच शिवालयांमध्ये दर्शनासाठी गर्दी करतात.
हर हर महादेवाच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय होते. या पवित्र दिवशी आपल्या नातेवाईकांना, मित्र-मंडळींना आणि आप्तस्वकीयांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यासाठी अनेक जण उत्सुक असताता, म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत काही खास निवडक 'शुभेच्छा संदेश'! ज्यामुळे तुम्ही तुमच्या स्नेहीजणांना शुभेच्छा देऊन त्यांचे हित बाळगू शकता.

महाशिवरात्री निमित्त खास शुभेच्छा संदेश (Wishes & Messages)
- "हाती डमरू, गळ्यात शेषनाग, ज्यांच्या अंगाला चर्चिली असे भस्म राख, अशा नीलकंठाचा हा पवित्र सण... तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!"
- "महादेवाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, हीच चरणी प्रार्थना. शुभ महाशिवरात्री!"
- "सत्य शिव आहे, सुंदर शिव आहे, अनंत शिव आहे, ब्रह्म शिव आहे... ओम नमः शिवाय! महाशिवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!"
- "जसा सोमनाथ, तसाच आहे काशी विश्वनाथ, ज्याच्या डोक्यावर चंद्र आणि हाती त्रिशूळ आहे साथ... अशा भोळ्या शंकराचा आशिर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहो!"
- "भगवान शिव तुमच्या मनातील सर्व शंकांचा नाश करोत आणि तुम्हाला ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेवोत. महाशिवरात्रीच्या पावन पर्वाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!"
- "भगवान शंकराचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहो, तुमच्या कष्टाला फळ मिळो आणि यशाची शिखरे तुम्ही सर करावीत, हीच शिवचरणी प्रार्थना. महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!"
- "त्रिनेत्र धारी, त्रिशूळ धारी, जो आहे संपूर्ण विश्वाचा कैवारी... अशा भोळ्या शंकराचा आशिर्वाद सदैव तुमच्या सोबत असावा. शुभ महाशिवरात्री!"
- "भक्तीचा सागर, प्रेमाची सावली, शंकर आहे आमची माऊली. शिवरात्रीच्या या शुभदिनी शिवशंभू तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत!"
- "ओम मध्येच आहे शक्ती, ओम मध्येच आहे मुक्ती... या महाशिवरात्रीला तुमच्या जीवनात शांती आणि समाधान लाभो. हर हर महादेव!"
- "विष पिऊन ज्याने जगाला वाचवले, त्या नीलकंठाचा महिमा अगाध आहे. तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांचे हलाहल महादेव दूर करोत. शुभेच्छा!"
- "ज्याच्या जटेतून वाहते गंगा, ज्याच्या भाळी आहे चंद्र, अशा निसर्गरूप महादेवाच्या उपासनेचा दिवस... महाशिवरात्रीच्या भक्तीमय शुभेच्छा!"
- "सत्य शिव आहे, सुंदर शिव आहे, अनंत शिव आहे आणि ब्रह्म शिव आहे. या अविनाशी शिवाचा सहवास तुमच्या आयुष्यात आनंद भरो. शुभ शिवरात्री!"
छोटे आणि प्रभावी संदेश (Mahashivratri Short Messages)
- "हर हर महादेव! महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा."
- "ओम नमः शिवाय! भगवान शिव तुम्हाला सुखी ठेवो."
- "महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर शिवशंभूचा आशिर्वाद लाभो!"
- "शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे... शुभ महाशिवरात्री!"
- "भक्तीचा जागर, शिवाचा सण... सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!"
- "कैलासपती शिवशंभू तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत."
- "दुःख हरो, सुख देवो... हर हर महादेव!"
- "भोळ्या शंकराचा आशिर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो."
- "महाशिवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा! जय भोलेनाथ."
- "एकच ध्यास, शिवचरणी विश्वास! शुभ महाशिवरात्री."












Click it and Unblock the Notifications