Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

विनोद कांबळीपेक्षा युवराज सिंगला दुप्पट पेन्शन! BCCI असे का करते? काय आहे नियम आणि सत्य घ्या जाणून

Yuvraj Singh double pension than Vinod Kambli : भारताचा एकेकाळचा दिग्गज धुरंधर फलंदाज..ज्याची क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू सचिन तेंडूलकरपेक्षाही जास्त चर्चा असायची आणि त्याच्यापेक्षाही वरचढ खेळाडू म्हणून एकेकाळी गणना व्हायची असा विनोद कांबळी...पण याच विनोद कांबळीच्या आयुष्यात अशी काही वादळं आली अन् त्याच्या काही जबर चुका की त्यामुळे हा खेळाडू यशाच्या शिखरावर पोहचूनही पुन्हा समस्यांच्या गर्तेत अडकला.

होय आपण त्याच क्रिकेटर कांबळीची गोष्ट करतोय जो भारत श्रीलंकेकडून हरला आणि श्रीलंकेने विश्वचषक जिंकला त्यावेळी विनोदचे ते अश्रू चाहत्यांसाठी अपार दुःख होतं...त्या दुःखापेक्षाही त्याची सद्यस्थिती पाहून चाहते हळहळले. विनोद कांबळीचा आजार आणि आर्थिक स्थिती त्यातूनच पुन्हा कांबळीबद्दल चर्चा सुरु झाल्या. त्याला मदतीसाठी हातही पुढे आले. तर 1983 विश्वकप विजेत्या टीमचा कप्तान कपिल देवनेही त्याला मदतीसाठी हात पुढे केले ते काही विनोद कांबळीच्याच चांगल्यासाठी असलेल्या अटी आणि शर्थीसह...

Yuvraj Singh double pension

विनोद कांबळीची अशी स्थिती आणि आर्थिक परिस्थिती पाहता त्याला बीसीसीआयकडून मिळणाऱ्या पेन्शनचाही विषय यानिमित्ताने चर्चिला जात आहे. आज पआण याच विषयावर माहिती जाणून घेऊया.

युवराजपेक्षाही कांबळीला पेन्शन कमी

विनोद कांबळी सध्या आयुष्याच्या कठीण टप्प्यातून जात आहेत. तो गंभीर आजाराने त्रस्त असून आर्थिक समस्यांनाही तोंड देत आहे. मात्र, कांबळीला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) मिळणारे पेन्शन युवराज सिंगच्या तुलनेत खूपच कमी आहे. पण असे का होते हे तुम्हाला माहिती आहे का? हे आपण जाणून घेऊया.

निवृत्त खेळाडूंच्या पेन्शनमध्ये 2022 मध्ये वाढ

बीसीसीआयने 2022 मध्ये निवृत्त झालेल्या खेळाडूंच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याची घोषणा केली होती. या सुधारणांतर्गत प्रथम श्रेणीतील खेळाडूंचे पेन्शन 15,000 रुपयांवरून 30,000 रुपये करण्यात आले. याशिवाय माजी कसोटीपटूंचे पेन्शन 37,500 रुपयांवरून 60,000 रुपये करण्यात आले आहे. ज्या खेळाडूंना यापूर्वी 50 हजार रुपये पेन्शन मिळत होती, त्यांची पेन्शन 70 हजार रुपये करण्यात आली आहे.

हेही वाचा : NZ vs ENG: जो रूटने तोडला सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम, असा करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला

कांबळीला युवराजपेक्षा निम्मे मिळते पेन्शन

मीडिया रिपोर्ट्सनुसार, युवराज सिंगला BCCI कडून 60,000 रुपये पेन्शन मिळते. तर कांबळीचे पेन्शन फक्त 30 हजार रुपये आहे आणि त्याचे कारण म्हणजे त्याने किती आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत हे आहे. त्याला भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये 25 पेक्षा कमी सामने खेळण्याचा अनुभव आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवृत्तीवेतन आणि लाभ योजनांमध्ये असा नियम आहे की खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सहभागाच्या आधारावर पेन्शन दिली जाते. यामुळे, युवराज सिंहला अधिक पैसे मिळतात.

हेही वाचा : सचिन तेंडूलकर अन् विनोद कांबळी एकमेकांना भेटून गहीवरले! कांबळींची गाणे गात गुरुला श्रद्धांजली! Video

BCCI द्वारे पेन्शन देण्याची प्रक्रिया

सामान्यतः खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीचा लांब पल्ला आणि त्यांच्या कामगिरीच्या आधारावर ठरवली जाते. कांबळीची कारकीर्द तुलनेने लहान होती आणि त्याने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात चमकदार कामगिरी केली, परंतु त्याची क्रिकेट कारकीर्द फार काळ टिकली नाही. दुसरीकडे, युवराज सिंगची कारकीर्द खूप मोठी आणि यशस्वी होती, त्यामुळे त्याला पेन्शनची रक्कमही जास्त मिळते. हे महत्वाचे कारण दोघांच्या पेन्शनमधील आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+