सचिन तेंडूलकर अन् विनोद कांबळी एकमेकांना भेटून गहीवरले! कांबळींची गाणे गात गुरुला श्रद्धांजली! Video
Vinod Kambli Sings Hindi Song For Guru Ramakant Achrekar Meets Sachin Tendulkar : सचिन तेंडूलर आणि विनोद कांबळी हे एकमेकांचे बालपणापासूनचे यार..त्यांची मैत्री आजही तशीच आहे. हो..थोडी नाराजी आली होती जेव्हा विनोद कांबळीने त्याच्यावर टीका केली होती पण या दोघांची यारी आगळी-वेगळीच. काल जेव्हा हे दोघे एका मंचावर आले तेव्हा अनेक कॅमेरे त्यांच्याकडेच फिरले. सचिनने उठून विनोद कांबळीजवळ जात हातात हात घेतला तेव्हा त्यांना गहीवरुन आले.
हा प्रसंग खूपच आनंददायी आणि गहीवरुन येणारा होता. निमित्त होते रमाकांत आचरेकर स्मृती अनावरण सोहळा.. मुंबईतील शिवाजी पार्कवर क्रिकेटचे धडे ज्यांनी दिले आणि त्यामुळे सचिन तेंडूलकर आणि विनोद कांबळी यांना कारकिर्दीत यशाच्या शिखरावर नेऊन पोहचवले त्या गुरु रमाकांत आचरेकर होय आणि आपल्या गुरुला आदरांजली देण्यासाठी हा सोहळा होता.

(फोटो क्रेडीट - ANI)
विनोद आणि सचिन जेव्हा भेटतात..
रमाकांत आचरेकर स्मृती अनावरण सोहळ्यात व्यासपीठावर जेव्हा विनोद कांबळी बसले तेव्हा तिथे राज ठाकरे उपस्थित होते. सचिनने व्यासपीठावर येताच आधी विनोद कांबळींकडे धाव घेतली आणि त्याच्याजवळ जात हातात हात घेतला हा प्रसंग खूपच गहीवरुन आणणारा ठरला. कारण विनोद कांबळी आणि सचिनच्या चेहऱ्यावरील मैत्रीचे भाव खूप काही सांगून जात होते.
गुरुसाठी विनोद कांबळीने गायले गाणे
विनोद कांबळी यांनी प्रकृती अस्वास्थ्य असतानाही रमाकांत आचरेकर यांना एक हिंदी गाणे गाऊन आदरांजली वाहिली, सचिन तेंडुलकरने टाळ्या वाजवून प्रतिक्रिया दिली. आजारी विनोद कांबळी देखील त्याच्या तब्येतीच्या चिंतेमुळे प्रथमच सार्वजनिक ठिकाणी दिसला. सचिन आणि कांबळी या बालपणीच्या दोन मित्रांनीही सोहळ्यादरम्यान आणि नंतरचे खास क्षण शेअर केले.
Vinod Kambli sang a special song to pay homage to late Ramakant Achrekar. Sachin Tendulkar seen clapping.#SachinTendulkar #VinodKambli pic.twitter.com/BFPjua3EQ0
— myKhel.com (@mykhelcom) December 3, 2024
रमाकांत आचरेकर एक महान प्रशिक्षक
2019 मध्ये निधन झालेले आचरेकर, भारताने आतापर्यंत निर्माण केलेल्या महान क्रिकेट प्रशिक्षकांपैकी एक म्हणून आदरणीय आहेत. तेंडुलकर आणि कांबळी यांच्यासह अनेक भारतीय क्रिकेटपटूंच्या कारकीर्दीला आकार देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, ज्या दोघांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्या हाताखाली प्रशिक्षण घेतले.
विनोद कांबळी प्रकृती बरी नसतानाही त्यांनी रमाकांत आचरेकर यांना श्रद्धांजली देण्यासाठी एक हिंदी गाणे गायले. त्याचा आवाज जरी अस्पष्ट येत होता पण चेहऱा भावविभोर होता. "सर जो तेरा चकराये, या दिल डुबा जाये - आजा प्यारे पास हमारे काहे घाबराये, काहे घबराय," कांबळीने स्टेजवर गायले आणि मग 'लव्ह यू सर' म्हणत आपले छोटेसे भाषण संपवले. या कार्यक्रमात कांबळी व्यतिरिक्त सचिन तेंडूलकर, संजय बांगर आणि इतरांनीही या कार्यक्रमात आचरेकरांच्या आठवणी सांगितल्या.
या कार्यक्रमात सचिन तेंडुलकर,विनोद कांबळी, संजय बांगर, पारस म्हांबरे, प्रवीण आंब्रे, समीर दिघे, बलबिंदर संधू ,मनसे नेते राज ठाकरे यांच्यासमवेत भारतीय दिग्गजांनी स्मारकाचे अनावरण केले.
विनोद कांबळी अन् सचिनची ती खेळी
विनोद कांबळी हे नाव जरी आज फारसे प्रसिद्धीच्या झोतात नसले तरी या नावामागे एकेकाळी मोठे वलय होते. सहाशेपेक्षा जास्त धावांची मोठी खेळी त्याने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये केली होती. त्यावेळी त्याने सचिनच्या साथीत हा विक्रम रचला होता. यानंतर दोघांचाही आपल्या क्रिकेटच्या जोरावर भारतीय संघात समावेश झाला. चांगली कामगिरी केल्यानंतर विनोद कांबळी त्याच्या काही चूकामुळे मागे पडत गेला तर सचिन सर्वांचा लाडका क्रिकेटर बनला अन् यशाच्या शिखरावर पोहचला.












Click it and Unblock the Notifications