जागतिक बुद्धीबळ स्पर्धा : भारताच्या गुकेशला सर्वात तरुण जग्गजेता होण्याची मोठी संधी! लिरेनचे आव्हान
World Chess Championship 2024 : जागतिक चॅम्पियनशिप आजपासून सुरू झाली असून यामध्ये भारतीय बुद्धीबळपटू डी. गुकेशला सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनण्याची संधी आहे त्याच्यासमोर डिंग लिरेनचे आव्हान असेल. पहिल्या सामन्यासह, स्पर्धेत खेळाडूंना जास्तीत जास्त 14 शास्त्रीय सामने खेळावे लागतील आणि 7.5 गुण मिळवणारा पहिला खेळाडू चॅम्पियनशिप जिंकेल. बरोबरी झाल्यास, विजेत्याचा निर्णय कमी कालावधीच्या सामन्याद्वारे केला जाईल.
भारतीय ग्रँडमास्टर डी गुकेश सोमवारपासून सुरू होणाऱ्या जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. या स्पर्धेत तो इतिहास रचू शकतो हे मनसुबे घेऊनच तो या स्पर्धेत उतरला आहे.

गुकेशचा सामना चीनच्या डिंग लिरेनशी
जागतिक चॅम्पियनशिपमध्ये गुकेशचा सामना गतविजेता चीनच्या डिंग लिरेनशी होणार आहे. लिरेनवर गुकेशचा वरचष्मा आहे यात शंका नाही, पण या अनुभवी चिनी खेळाडूला कमी लेखणे चूक ठरू शकते, असे तज्ज्ञ खेळाडूंचे मत आहे.
आजपासून चॅम्पियनशीप
जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सोमवारपासून सुरू होणाऱ्या पहिल्या सामन्यासह, खेळाडूंना जास्तीत जास्त 14 क्लासीकल सामने खेळावे लागतील आणि 7.5 गुण मिळवणारा पहिला खेळाडू चॅम्पियनशिप जिंकेल. बरोबरी झाल्यास, विजेत्याचा निर्णय कमी कालावधीच्या सामन्याद्वारे केला जाईल.
गुकेश डिंग लिरेनपेक्षा वरचढ
गुकेश आणि लिरेनची सध्याची कामगिरी पाहता, 18 वर्षीय गुकेश वरचढ असल्याचे दिसते. तो सर्वात तरुण चॅलेंजर आहे आणि त्याला सर्वात तरुण जगज्जेता बनण्याची संधी आहे.
क्रमवारीत लिरेन 23 व्या तर गुकेश पाचव्या क्रमांकावर
2023 मध्ये विजेतेपद पटकावल्यानंतर लिरेनची जागतिक क्रमवारीत 23 व्या स्थानावर घसरण झाली. दुसरीकडे, गुकेश जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर पोहोचला. एप्रिलमध्ये लिरेनविरुद्धच्या जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. लिरेनला मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे तो जागतिक विजेतेपद गमावू शकतो हे त्यानेच म्हटलेले आहे.
गुकेशकडे अनुभवाची कमतरता
जागतिक स्पर्धेत गुकेश अगदी लहान वयात मोठी झेप घेत आहे. त्याच्याकडे प्रचंड गुणवत्ता आहे आणि त्याला खेळ कसा खेळायचा माहीत आहे पण एक गोष्ट म्हणजे त्याच्याकडे मोठ्या सामन्याचा लिरेनपेक्षा कमी अनुभव आहे, लिरेनचे आव्हान कमी लेखता येणार नाही, असे दिग्गज खेळाडू मॅग्नस कार्लसनचे मत आहे.












Click it and Unblock the Notifications