Who is Venkat Dutta Sai : पीव्ही सिंधू ज्याच्याशी लग्न करणार ते वेंकट दत्ता साई आहेत तरी कोण? वाचा
Who is Venkat Dutta Sai : दोनवेळा ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू 22 डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. हैदराबादस्थित पोसिडेक्स टेक्नॉलॉजीजचे कार्यकारी संचालक वेंकट दत्ता साई यांच्याशी तिचा उदयपूर येथे लग्न होणार आहे. खास बाब म्हणजे रविवारी लखनऊ येथे सय्यद मोदी इंटरनॅशनल येथे आपल्या खेळात तिने विजेतेपद पटकावले, त्यानंतर लग्नाची घोषणा तिच्या वडीलांनी केली.
पीटीआयच्या म्हणण्यानुसार, लग्नाचे कार्यक्रम 20 डिसेंबरपासून सुरू होतील आणि 24 डिसेंबरला दोन्ही कुटुंबे हैदराबादमध्ये रिसेप्शनचे आयोजनही करणार आहेत.

डिसेंबरमध्येच लग्न का?
"दोन्ही कुटुंब एकमेकांना ओळखत होते, परंतु एक महिन्यापूर्वीच सर्व काही निश्चित झाले होते. कारण जानेवारीपासून तिचे वेळापत्रक व्यस्त असणार आहे," असे सिंधूचे वडील पीव्ही रमणा यांनी सांगितले." म्हणूनच दोन्ही कुटुंबांनी 22 डिसेंबरला विवाहसोहळा ठेवण्याचा निर्णय घेतला. 24 डिसेंबरला हैदराबादमध्ये रिसेप्शन होणार आहे. पुढचा सीझन महत्त्वाचा असल्याने ती लवकरच तिच्या प्रशिक्षणाला सुरुवात करेल," असे ते म्हणाले.
हेही वाचा : दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी पीव्ही सिंधू फिटनेसबाबत आहे खूपच स्ट्रिक्ट,करते हा डाएट फॉलो
व्यंकट दत्ता साई कोण आहेत?
वेंकट दत्ता साई यांनी फाउंडेशन ऑफ लिबरल अँड मॅनेजमेंट एज्युकेशनमधून लिबरल आर्ट्स अँड सायन्सेस/लिबरल स्टडीजमध्ये डिप्लोमा केला. त्यांनी 2018 मध्ये फ्लेम युनिव्हर्सिटी बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमधून बीबीए अकाउंटिंग आणि फायनान्स पूर्ण केले आणि त्यानंतर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बंगलोर येथून डेटा सायन्स आणि मशीन लर्निंगमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.
पीव्ही सिंधूचे होणारे पती व्यंकट दत्ता साई पॉसाइडेक्स टेक्नॉलॉजीज हैदराबाद हाय-टेक सिटीचे संचालक म्हणून काम करत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मिशन लर्निंग, डेटा मॅनेजमेंट, डेटा ॲनालायझिंग सेगमेंटशी संबंधित ही कंपनी आहे. कंपनीची स्थापना 2003 मध्ये झाली. आघाडीच्या कंपन्यांना डेटा व्यवस्थापन सेवा प्रदान करणे. त्याची यूएसए आणि कॅनडामध्ये कार्यालये आहेत.
हेही वाचा : पीव्ही सिंधूंच ठरलं! 'या' तारखेला लग्न करणार! व्यंकट दत्ता साईंशी शुभमंगल, राजस्थानमध्ये होणार सोहळा
Posidex Technologies च्या क्लायंटमध्ये बँकिंग, वित्तीय सेवा, विमा, सिक्युरिटीज, रिटेल, टेलिकॉम, क्रेडिट ब्युरो क्षेत्र आणि काही सरकारी विभागांचा समावेश आहे. व्यंकट दत्ता साई हे या कंपनीचे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहत आहेत.
वेंकट दत्ता साई यांनी JSW सोबत समर इंटर्न तसेच इन-हाउस कन्सल्टंट म्हणून काम केले. 2019 पासून, त्यांनी Sour Apple मालमत्ता व्यवस्थापनासाठी व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले आहे.












Click it and Unblock the Notifications