दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी पीव्ही सिंधू फिटनेसबाबत आहे खूपच स्ट्रिक्ट,करते हा डाएट फॉलो
PV Sindhu's Diet And Fitness Routine : भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये तिचा पहिला सामना जिंकून सिंधूने मालदीवच्या फातिमा नबाहा अब्दुल रज्जाकचा पराभव केला आहे. यानंतर सिंधू 31 जुलै रोजी होणाऱ्या दुसऱ्या ग्रुप सामन्यात एस्टोनियाच्या क्रिस्टिन कुबासोबत सामना होणार आहे. या सामन्यांमध्ये जिंकल्यानंतर पी व्ही सिंधू फ्री क्वार्टर फायनल मध्ये जाणार आहे
पीव्ही सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पोडियम गाठण्यात ती यशस्वी ठरली तर पदकांची हॅट्ट्रिक पूर्ण करणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरणार आहे.

रोज पहाटे 4 वाजता उठते पीव्ही सिंधू
पीव्ही सिंधूचा दिवस रोज पहाटे 4 वाजता सुरू होतो. ती रोज सकाळी लवकर उठते आणि सराव करते. रोज सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत त्यांच्या सरावाचे सत्र असते. त्यानंतर ती लंचसाठी ब्रेक घेते. ती तिच्या सराव सत्रात भरपूर पाणी आणि इतर लिक्विड फूड घेते. जेणेकरून डिहाइड्रेशन आणि थकवा जाणवणार नाही.
शिस्तप्रिय आणि मेहनती खेळाडू
पीव्ही सिंधूची गणना सर्वात शिस्तप्रिय आणि मेहनती खेळाडूंमध्ये केली जाते. जे आपल्या सरावाशी अजिबात तडजोड करत नाहीत. यासाठी ती काटेकोर डाएट आणि एक्सरसाइज रूटीन फॉलो करते.आज आम्ही तुम्हाला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूचा डाएट सांगणार आहोत.
रोज सकाळी रनिंग करायला विसरत नाही
पीव्ही सिंधू रोज काही वेळ काढून रनिंग करायला विसरत नाही. रनिंग हा तिच्या वर्कआउट प्लॅनचा एक भाग आहे, ती दररोज वेळ काढून रनिंग करते.
आहार
पीव्ही सिंधू सकाळी अंडी, फळे, दूध आणि भरपूर खनिजे आणि प्रथिने असणारा नाश्ता करते. सिंधू तिच्या नाष्ट्यात कर्बोदक आणि प्रथिनांचा देखील समावेश करते.
सकाळ दुपारचं जेवण घरीचं
दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण पी व्ही सिंधू कायम घरी बनवलेले जेवण करते .भात , मांस आणि भाज्या हे त्यांच्या आहारातील मुख्य घटक आहेत.अशा प्रकारे तिला प्रथिने आणि आवश्यक पोषक तत्वांचा समावेश करते.यासोबतच पीव्ही सिंधू तिच्या आहारात फळे आणि सुक्या मेव्यालाही खूप महत्त्व देते.
व्यायाम
पीव्ही सिंधूच्या फिटनेस आणि वर्कआउट प्लॅनमध्ये वारंवार बदल होत आहेत.पीव्ही सिंधू तिच्या प्रशिक्षकाच्या मदतीने वर्कआउट प्लॅन तयार करते.पाय,खांदे आणि गुडघ्यांची ताकद वाढवणारे व्यायाम तिला करायला आवडतात.












Click it and Unblock the Notifications